आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवार शांत अन‌् मळ्यांत माैन, शेतकऱ्यांचा नेता हरपला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘मी जे पिकवताे, त्याचं दामही मीच ठरवणार’चा विश्वास शेतकऱ्यांत निर्माण करणारा नेता एेंशीच्या दशकात ‘शेतकरी संघटना’ नावाचे एक चक्रीवादळ घाेंगावत अाले. त्याचा केंद्रबिंदू हाेता प्रगत शेतीसाठी प्रसिद्ध नाशिक जिल्हा अन् उगमस्राेत हाेते शरद जाेशी. सतत याचकाच्या भूमिकेत राहणाऱ्या बळीराजाला ‘भीक नकाे, हवे घामाचे दाम’ असं सरकारी यंत्रणेच्या डाेळ्याला डाेळा भिडवत हिंमतीनं बाेलायला शिकवलं ते या ‘शेतकऱ्यांच्या पंचप्राणा’नं. शनिवारी निधन झालेल्या जाेशीसाहेबांच्या प्रतिमा अाजही अनेक शेतकऱ्यांच्या देवघरात अाहेत, यात नवल ते काय! अांतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय झालेली शेतकरी संघटना अाणि शरद जाेशी नामक अलाैकिक नेतृत्वाचा हा अाठवणरूपी प्रवास...
सन १९८२ मध्ये शेतकरी संघटनेच्या अधिवेशनावेळी शरद जाेशी, त्यांच्या पत्नी लीला जाेशी, भाई धारिया यांचे स्वागत करताना रामचंद्रबापू पाटील, प्रल्हाद पाटील कराड, माधवराव माेरे.
सटाणा येथे १९८२ मध्ये झालेल्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी.
पुढील स्‍लाइडवर वाचा मला मिळाले पहिले हक्काचे घर अन् महिलांना आदराचे स्थान
बातम्या आणखी आहेत...