आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकरी संघटना पुन्हा उतरणार रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यातील भाजप सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा काेरा करण्याची मागणी केलेली असताना तत्त्वत:, सरसकट आणि निकषांच्या आधीन असलेली देवेंद्र फडणवीस सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा भडकेल, असा इशाराही त्यांनी दिला.

तातडीने द्यावयाच्या दहा हजार रुपये पीककर्जाचे आदेश त्यातील निकषही शेतकऱ्यांचा अंत पाहणारे आहेत, त्यामुळे ही कर्जमाफीही फसवी असून सातबारा कोरा होणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. याच मागणीकरिता आता शेतकऱ्यांनीच सरकारच्या विरोधात उभे रहावे, यावर राज्यभरात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेकडून विचारमंथन सुरू झाले आहे.

पवार पुढे म्हणाले की, आजची स्थिती अत्यंत वाईट आहे, शेतकरी खरिपाच्या पेरणीकरिता बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत म्हणून थांबला आहे. तर सरकारने तातडीने दहा हजारांचे पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले असले, तरी सरकारी इतर बँकांना अद्यापही तसे निर्देश नाहीत. ही योजना राबवायला सरकारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही, आदेश मात्र निघत आहेत, त्याची अंमलबजावणी कोणी करायची? त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वत: आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व करायला पुढे आले पाहिजे. याच महिन्यात पुन्हा एकदा सातबारा कोरा व्हावा, या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे, कारण, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही, अशी स्थिती आहे.  

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... अमित शहांच्या दौर्‍यामुळे फडणवीसांनी वेळ मारून नेली
बातम्या आणखी आहेत...