आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या बैठकीत टीपी स्कीमला तीव्र विराेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मखमलाबाद शिवारातील शेतकऱ्यांच्या बुधवारी (दि. २५) झालेल्या बैठकीत टीपी स्कीमला तीव्र विराेध दर्शविण्यात अाला. या याेजनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात अाले.

टीपी स्किममध्ये भाग घ्यायचा की नाही, यावरील या बैठकीत टीपी याेजनेला शेतकऱ्यांनी विराेध केला. स्किमबाबत राष्ट्रवादीचे शरद काेशिरे म्हणाले, शहरात पार्किंगची समस्या वाढली असून रस्त्यांची दुरवस्था झाली अाहे. चाेऱ्यांचे प्रमाणही वाढत असताना स्मार्ट सिटीची चर्चा केली जात अाहे. शेतकऱ्यांनी याेग्य ती भूमिका घ्यावी असे काेशिरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अाठ दिवसांत कसा विचार करायचा पालिकेलातीन डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा असून, त्वरित प्रस्ताव सादर करावे अशा सूचना पालिकेने शेतकऱ्यांना केल्या अाहेत. शेती हा भविष्याकाळातील महत्वाचा विषय असल्याने तत्काळ प्रस्ताव कसा सादर करणार असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला.

नवीन विकास अाराखडा मंजूर झाला तर सुमारे ३० हजारांहून अधिक हरित क्षेत्राचे पिवळ्या पट्ट्यात रूपांतर हाेईल. अाधीच शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने पुन्हा नवीन टीपी स्कीममधून कमी हाेईल, असे म्हणून काहींंनी स्कीमला अप्रत्यक्ष विराेध केला. याशिवाय टीपी स्कीमएेवजी अधिक माेबदला देण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर करावा, असा सूर या वेळी व्यक्त झाला.

स्मार्ट सिटी काेणासाठी
मूलभूत सुविधा देण्यासाठी पालिका अपयशी ठरत असताना स्मार्ट सिटीसाठी अाता प्रयत्न केले जाऊ लागले अाहेत. याेजना तर येतच राहणार, परंतु शेती शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्राेत अाहे. मंजूर याेजना राबविल्या जात नाही. त्याता अाता पुन्हा शासकीय निधी वाया जाणार अाहे. त्यामुळे खरेच अाताच स्मार्ट सिटीची गरज अाहे. स्मार्ट सिटी नक्की काेणासाठी, असा प्रश्न देखील बैठकीत उपस्थित केला गेला.

यांची हाेती उपस्थिती
बैठकीस शरद काेशिरे, सुनील बागुल, देवेंद्र काेशिरे, अार्कि. माेहन रानडे, अमृता पवार, संजय बागुल, अनिल चाैघुले, महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, अार. के. पवार यांच्यासह मखमलाबादचे शेतकरी उपस्थित हाेते.