आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Farming Goods: Onion Export Prices Impact By Inflation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेत माल : कांदा निर्यातीलाही भाववाढीचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आवक घटल्याने तसेच मागणीत वाढ झाल्याने रविवारी नाशिक शहरात कांद्याची 50 रुपये, तर देशातील मोठय़ा शहरांत 60 ते 65 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. भाववाढीमुळे निर्यातक्षम कांद्याचे दरही भडकले असून, सध्या 850 ते 900 डॉलर प्रतिटन कांद्याचे दर आहेत. त्यामुळे परदेशातूनही कांद्याची मागणी घटली असून, निर्यातीला फटका बसला आहे.

नाशिक जिल्ह्यातून निर्यात होणार्‍या कांद्याचे दर प्रतिटन 900 डॉलरवर पोहोचले आहेत. त्यामुळे मलेशिया, थायलंड, सिंगापूर, कुवेत, दुबईमधील व्यापार्‍यांनी भारतातील कांदा खरेदी करण्याऐवजी पाकिस्तान आणि चीनचा कांदा खरेदी करण्यास पसंती दिली आहे. ऑगस्ट 2012 मध्ये पहिल्या आठवड्यात 12 हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. ऑगस्ट 2013 च्या पहिल्या आठवड्यात केवळ 700 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. त्यावेळी कांद्याचे स्थानिक दर 2700 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल, तर 580 ते 620 डॉलर मेट्रिक टनाचे दर होते. देशांतर्गत कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याने निर्यातक्षम कांद्याचे दर हे 850 ते 900 डॉलर झाले आहे.


कांदा निर्यातीलाही भाववाढीचा फटका
इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर येथील व्यापारी हे चीन आणि पाकिस्तानचा लाल कांदा खरेदी करण्यासाठी पसंती देत आहेत. कुवेत, दुबई आणि संयुक्त अरब अमिरात हे पाकिस्तानच्या कांद्याला पसंती देत आहेत. तर, श्रीलंकेत स्थानिक कांदा बाजारात आल्याने तेथील सरकारने आयात कर हा 10 टक्क्यांवरून थेट 30 टक्के केला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याने श्रीलंकन व्यापारी उन्हाळ कांदा खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.


परदेशातून मागणी नाही
कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने आम्हाला निर्यातीसाठी कांदा खरेदी करण्यास भीती वाटत आहे. परदेशातून दर शनिवार आणि रविवारी मालाची मागणी होते. मात्र, या आठवड्यात मागणीच आलेली नाही.
विकास सिंग, कांदा निर्यातदार, पार्वती एन्टरप्राईजेस