आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farming Market : Raid On Onion Traders, Price Touch 200 Rupee

शेतमाल बाजारपेठ : कांदे व्यापा-यांवर छापे, भाव 200 ने घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातत्याने वाढणारे दर आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याने शासनाने कांद्याची साठेबाजी होणार नाही, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. पाठोपाठ प्राप्तिकर विभागाने लासलगाव, नामपूर आणि उमराणे येथील कांदा व्यापा-यांवर धाडी टाकल्या. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापा-यांमध्ये भीती पसरल्याने त्यांनी कांदा खरेदी टाळली. परिणामी बुधवारी कांदा दरात क्विंटलमागे दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली.

छापे व्यापा-यांवर असले तरी परिणाम मात्र कांदा उत्पादकांवर झाला. त्यांना कमी दराने विक्री करावी लागली. ऑगस्टमध्ये कांद्याने हंगामातील उच्चांकी दर गाठल्याने किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दर होते. लासलगाव बाजार समितीत बुधवारी किमान 1 हजार ते जास्तीत जास्त 4 हजार 480 रुपये दर होता. तर पिंपळगाव बाजार समितीत किमान 3200 तर कमाल 4480 रुपये क्विंटल कांद्याचा दर होता.