आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपवास करा, आरोग्यही सांभाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इस्लाम धर्मातील पवित्र समजल्या जाणार्‍या रमजान महिन्यात उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी‘शी बोलताना दिला. उपवासाच्या काळात हलका आहार घ्यावा असेही तज्ज्ञांनी सांगितले.

पवित्र कुराण या धर्मग्रंथातही आजारी लोकांनी उपवास करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे लहान मुले, गर्भवती महिला, आजारी, वृद्ध, मानसिक रुग्ण आदींनी उपवास करणे टाळावे. आजारी व्यक्तींनी उपवासापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधुमेह, हृदयरोग असणार्‍यांनीही शक्यतो उपवास टाळावा. रमजानमध्ये महिनाभर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाणी व भोजनाचा त्याग केला जातो.

अर्थात दैनंदिन आहाराच्या वेळेतील बदलामुळे आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता असते. आहाराच्या सवयीतील बदलामुळे पित्त, अपचनासारखे त्रास संभवतात. मधुमेह व हृदयरोग असणार्‍या व्यक्तींनी तेल, कबाब, बिर्याणी आणि चिकन या पदार्थांपासून दूर राहावे.

आजारी व्यक्तींना सूट
रमजानच्या उपवासांमागे गरिबीची जाणीव र्शीमंतांना व्हावी, हा अल्लाहचा उद्देश आहे. या काळात आजारी व्यक्तींना कुराणात उपवासाची सवलत दिली आहे. मौलाना मो. एजाज रजा मकराणी, रजा अकॅडमी

अल्प आहार फलदायी
रमजानच्या उपवासात अल्प आहार आरोग्यास लाभदायी ठरतो. संतुलित आहारामुळे ब्लड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. तसेच अँसिडीटी व गॅसेसची समस्याही उद्भवत नाही. डॉ. एन. आर. भोये, आहारतज्ज्ञ