आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक औषधांची विनाप्रिस्क्रिप्शन विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - जनावरांनाबेशुद्ध करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी किटामाइन-५० आणि झायलोझीन या इंजेक्शनचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वापर होत असतो. मात्र, डाॅक्टरांची प्रिस्क्रिप्शन असेल तरच औषध विक्रेत्यांना या इंजेक्शनची विक्री करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, हे इंजेक्शन सध्या शहरातील काही विक्रेत्यांकडे अगदी सहजरीत्या मिळत असल्याने चोरट्यांकडून जनावरे चोरी करण्यासाठी या इंजेक्शनचा गैरवापर केला जात आहे. हे इंजेक्शन जनावरांना दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत जनावर बेशुद्ध होते. तसेच, अतिरिक्त डोस दिला गेला तर जनावराचा जीवही जातो. असे असतानादेखील छुप्या पद्धतीने या इंजेक्शनची विक्री होत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले आहे.

आॅक्सिटोसीन हे इंजेक्शन जनावराच्या, तसेच मनुष्याच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम करते. कृत्रिम पान्हा फोडण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो. या इंजेक्शनमधील घातक द्रव्ये दुधामध्येदेखील येतात. त्यामुळे या इंजेक्शनचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावरही होतो. या पार्श्वभूमीवर शासनाने दहा वर्षांपूर्वी आॅक्सिटोसीनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच हे औषध विकण्याची परवानगी आहे. या इंजेक्शनचा साठादेखील करण्यास औषध विक्रेत्यांना मनाई आहे. मात्र, या इंजेक्शनला दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आणि प्रिस्क्रिप्शन बंधनकारक असल्याने विक्रेत्यांनी आता हे इंजेक्शन बनावट बाटलीमध्ये विकण्याचा फंडा सुरू केला आहे. या फंड्याद्वारे अन्न औषध प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असून, ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीच्या हातीदेखील विनाप्रिस्क्रिप्शन हे इंजेक्शन पडल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी दूधविक्रेत्यांकडून आजमावल्या जाणाऱ्या या गैरमार्गामुळे नागरिकांसह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी, तसेच नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

ओळखअसल्यास घरपोच सेवा
ऑक्सिटोसीनचेगंभीर दुष्परिणाम पाहता शासनाने मागील दहा वर्षांपूर्वी आॅक्सिटोसीनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. प्रिस्क्रिप्शन असेल तर औषध विक्रेत्यांना त्याची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक औषध दुकानांमध्ये या इंजेक्शनची खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून येते. औषध विक्रेत्यांचा रोजचा आणि ओळखीचा ग्राहक असेल तर या इंजेक्शनच्या ऑर्डर्स नोंदवून ते घरपोच दिले जात असल्याची बाबही पशुप्रेमी संघटनांनी ‘डी. बी. स्टार’शी बोलताना सांगितली.


असे मिळवले ‘आॅक्सिटोसीन’
विनाप्रिस्क्रिप्शनजनावरांच्या औषधांची विक्री होत असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे आल्या. या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ने पाथर्डी फाटा परिसरातील एका औषध विक्रेत्याकडे दुपारी वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीसोबत वीस वर्षीय युवक होता. ज्याने औषध विक्रेत्याकडे विनाप्रिस्क्रिप्शन ‘आॅक्सिटोसीन’ची मागणी केली. विक्रेत्याने कुठल्याही प्रकारची चाैकशी करता, प्रिस्क्रिप्शनशविायच कागदात गुंडाळून एका पांढऱ्या रंगाच्या बाटलीत ‘आॅक्सिटोसीन’ दिले.

दुष्परिणाम असे
जनावरांनीअधिक दूध द्यावे, यासाठी दूध व्यावसायिकांकडून त्यांना ‘ऑक्सिटोसीन’ या कृत्रिम हार्मोन्स इंजेक्शनचे डोस दिले जातात. या इंजेक्शनच्या अतिरेकामुळे जनावरांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होऊन त्यांच्या आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होतात. शविाय, अशा जनावरांचे दूध पिणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावरही गंभीर दुष्परिणाम होतात. या दुधाने वयात येण्यापूर्वीच प्रौढत्व येणे, महिला युवतींच्या चेहऱ्यावर केस येणे अशी लक्षणे दिसून येतात.

प्रिस्क्रिप्शनविना मिळाले ‘किटामाइन’
शहरातविनाप्रिस्क्रिप्शन किटामाइन विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने शहरातील अशाेक स्तंभ परिसरातील औषध विक्रेत्यांकडे त्याची मागणी केली असता, विनाप्रिस्क्रिप्शन हे इंजेक्शन देण्यात आले नाही. यानंतर ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने भद्रकाली परिसरातील विक्रेत्यांकडे मागणी केली असता त्या ठिकाणी विनाप्रिस्क्रिप्शन ‘किटामाइन-५०’ उपलब्ध झाले. शहरातील काही प्रमुख भागातील विक्रेते सोडल्यास अन्यत्र उघडपणे या औषधांची विक्री होत असल्याचे यावरून दिसून येते. दुष्यंत भामरे, उपायुक्त,औषध प्रशासन विभाग

या किमतीत मिळाली विनाप्रिस्क्रिप्शन औषधे
- ३५ रुपये किमतीचे आॅक्सिटोसीन २०० रुपयांत मिळाले.
- ११५ रुपये किटामाइन, तर ३४६ रुपये झायलोझीन इंजेक्शनचे घेण्यात आले.

गैरवापर वाढतोय...
- पशुवैद्यकीयडाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशविाय आॅक्सिटोसीनसारख्या इंजेक्शनची विक्री औषध विक्रेत्यांना करता येत नाही. गाय आणि म्हशीची डिलवि्हरी करण्यासाठीदेखील आॅक्सिटोसीनचा वापर होतो. मात्र, जनावरांकडून अतिरिक्त दूध मिळवण्यासाठी व्यावसायिकांकडून याचा अधिक गैरवापर केला जात आहे. या इंजेक्शनचा साठा करणे गुन्हा आहे. डाॅ.संजय विसावे, पशुसंवर्धनउपायुक्त

कडक कारवाई होणे गरजेचे
जनावरांनाघातक ठरणाऱ्या इंजेक्शनची शहरातील औषध विक्रेत्यांकडून सर्रासपणे विक्री सुरू आहे. कोणतेही इंजेक्शन घेताना पशुवैद्यकीय डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन महत्त्वाचे ठरते. जास्त नफा कमावण्याच्या नादात दूध उत्पादक गायी, म्हशींना आॅक्सिटोसीनचे डोस देतात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणामी माणसांच्याही आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे आॅक्सिटोसीनसारख्या इंजेक्शनची छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्या त्याचा गैरवापर करणाऱ्या दूध उत्पादकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. गौरवक्षत्रिय, संस्थापक अध्यक्ष, आवास

छुप्या मार्गाने विक्री घातकच
प्रिस्क्रिप्शनअसेल तरच ‘आॅक्सिटोसीन’ विकण्याची परवानगी आहे. मात्र, दूध उत्पादकांकडून औषध विक्रेत्यांना हाताशी धरून चोरीच्या मार्गाने आॅक्सिटोसीन मिळवले जाते. जनावरांना कृत्रिम पान्हा फोडण्यासाठी दूध उत्पादक मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतात. याचा साठादेखील करता येत नाही, त्यामुळे विक्रेते सुट्या बाटलीमध्ये याची गैरमार्गाने विक्री करतात. तसेच, किटामाइन शरीरावर दुष्परिणाम करणारे आहे. शस्त्रक्रियेच्या वेळी जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी याचा वापर सर्जन करतात. मात्र, आता किटामाइनचा गैरवापर वाढला आहे. नशा येण्यासाठी, तसेच जनावरे चोरीच्या घटनांमध्ये याचा वापर होत आहे. -डाॅ. बी. आर. ठाकूर, अध्यक्ष,प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नाशिक

पाथर्डी फाटा येथील एका विक्रेत्याकडे ‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने आॅक्सिटोसीनची मागणी केल्यावर त्याने थांबण्यास सांगून काही वेळाने एका युवकाकडे अशाप्रकारे कागदात गुंडाळून विनाप्रिस्क्रिप्शन आॅक्सिटोसीन आणून दिले. अनेक ठिकाणी कुठल्या तरी एखाद्या बाटलीत सुटे आॅक्सिटोसीनही विक्री होत असल्याचे दिसून आले.
थेट प्रश्न
औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात बंदी घातलेल्या औषधांचीही विक्री; दूध व्यवसायासाठीही होताेय गैरवापर
- अन्न औषध प्रशासनाकडून जनावरांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या काही औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, तर काही औषधांची डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच विक्री करायला मुभा आहे. मात्र, असे असतानाही घातक ठरणाऱ्या या औषधांची शहरात काही ठिकाणी सर्रास विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आला आहे. ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने शहरातील भद्रकाली आणि पाथर्डी फाटा येथील औषध विक्रेत्यांकडे प्रिस्क्रिप्शनशविाय औषधे मिळतात का, हे पाहण्यासाठी एका ग्राहकासोबत प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी किटामाइन -५०, झायलोझीन आणि आॅक्सिटोसीन हे इंजेक्शन डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसतानाही मिळाल्याने अशा विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे अधोरेखित झाले. अशा औषधांच्या छुप्या पद्धतीने होणाऱ्या विक्रीमुळे प्राण्यांच्या परिणामी मानवाच्याही जीवितास धोका असतानाही त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझोत...
- आॅक्सिटोसीन, झायलोझीन आणि किटामाइन यांसारखे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी पशुवैद्यकीय डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असते, हे बरोबर आहे ना?
हेइंजेक्शन शेड्यूल एकमध्ये येतात. त्यामुळे हे इंजेक्शन पशुवैद्यकीय डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असल्याशविाय विक्री करू नये, असे आदेश औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

- आदेशदेऊनही आॅक्सिटोसीन, किटामाइन यांसारख्या इंजेक्शनची प्रिस्क्रिप्शनशविाय विक्री होत आहे, हे माहीत आहे काय?
यापार्श्वभूमीवर तपासणी करीत वेळोवेळी जनावरांच्या गोठ्यांवर, तसेच संबंधित औषध विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

- सातत्याने कारवाई केली जात असते. मग छुप्या मार्गाने होणारी ही विक्री थांबत का नाही, या विक्रेत्यांवर अंकुश का नाही?
छुप्यामार्गाने विक्री सुरू असेल तर आता आणखीन कडक कारवाई करणार. कारवाईत कुणीही दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...