आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: पित्याच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : मित्राच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे अामिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्याचा धक्कादाक प्रकार वडाळारोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, वडिलांच्या मित्रासोबत असलेल्या संशयित शहा हसन नवाब याने ‘तू मला आवडते’ असे म्हणत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मोबाइल नंबर दिला. त्यानंतर एके दिवशी ताे शाळेत आला. वडिलांच्या भावाच्या अोळखीचा असल्याने मी त्याच्यासोबत गेली. भवानी माथा, टाकळीरोड येथे नेऊन त्याने बलात्कार केला. याबाबत घरी सांगण्याची धमकी देत वारंवार शारीरिक छळ केला. पोट दुखत असल्याने सोनोग्राफी केल्यानंतर गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...