आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्या पित्याकडून विकलांग मुलीचा खून, दोन महिन्यांनंतर उलगडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंध आणि विकलांग मुलीला पित्याने गोदावरी नदीत फेकून देत तिचा खून केल्याचा प्रकार दोन महिन्यांनंतर उघडकीस आला आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पित्यास बेलूर (जि. यवतमाळ) येथे अटक करण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, कैलास सीताराम कांबळे असे या पित्याचे नाव असून तो पत्नी ज्योती, विकलांग मुलगी सनिका ऊर्फ छकुली (वय 7) आणि दोन वर्षीय मुलासमवेत माडसांगवी येथे राहत असे. गणेशोत्सव काळात 14 सप्टेंबर रोजी कांबळे कुटुंब पंचवटीत आले. येथे मुलीला खाऊ घेऊन देण्याचा बहाणा करून त्याने गोदावरी नदीपात्रात तिला फेकून दिले. त्यानंतर मुलीला अंध शाळेत ठेवल्याचे सांगून त्याने दोन महिने हा प्रकार लपवून ठेवला. शनिवारी सानिकास भेटण्यावरून त्याचे पत्‍नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो बाहेरगावी गेला. याबाबत संशय आल्याने पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर निरीक्षक बाजीराव भोसले यांनी पथक पाठवून बेलूर येथून संशयितास ताब्यात घेतले. मुलीचा खून केल्याची त्याने कबुली दिली. आडगाव पोलिसात 15 सप्टेंबर 2013 या दिवशी मुलीचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याची नोंद होती. मुलीच्या आईस मृत मुलीचे कपडे दाखवण्यात आल्यानंतर ओळख पटताच तिने हंबरडा फोडला.