आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाह करणा-या गर्भवती मुलीची पित्‍याकडून हत्‍या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जातीबाहेर लग्न करणा-या मुलीला पित्‍यानेच गळा आवळून ठार केले. ही मुलगी 9 महिन्‍यांची गर्भवती होती. त्‍यामुळे एक नव्‍हे तर दोन जीवांची हत्‍या या पित्‍याने केली आहे. 'ऑनर किलिंग'चा हा धक्‍कादायक प्रकार नाशिकमध्‍ये घडल आहे.

प्रमिला दीपक कांबळे असे या मुलीचे तर एकनाथ किसन कुंभारकर असे वडिलांचे नाव आहे. प्रमिला कामगारनगर येथे राहत होती. काही वर्षांपूर्वी तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. त्‍याचा राग अतापर्यंत वडिलांच्‍या मनात होता. आजारी असल्‍याचा बहाणा करुन कुंभारकर यांनी तिला ऑटोरिक्षामधून रुग्‍णालयात नेले. रिक्षाचालकाला रुग्‍णालयात चौकशी करण्‍यासाठी पाठविले. तो परत येईपर्यंत कुंभारकर यांनी तिची हत्‍या केली होती. रिक्षाचालकाने तिला रुग्‍णालयात नेले. परंतु, तिला मृत घोषित करण्‍यात आले. प्रमिला 9 महिन्‍यांची गर्भवती होती. त्‍यामुळे संतापाच्‍या भरात कुंभारकर यांनी त्‍या चिमुकल्‍याला मातेच्‍या पोटातच संपविले. या घृणास्‍पद कृत्‍यामुळे नाशिकमध्‍ये खळबळ उडाली आहे.

कुंभारकर यांना अटक करण्‍यात आली असून त्‍यांची कसून चौकशी करण्‍यात येत आहे.