आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन मुलांचा गळा घाेटून बापाचा अात्महत्येचा प्रयत्न; वाचलेल्या एका मुलीची बापाला आर्त हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत देवराज आणि वैष्णवी. - Divya Marathi
मृत देवराज आणि वैष्णवी.
नाशिक- नाशिकरोड येथील जगताप मळा परिसरात एका नराधम बापाने गुरुवारी स्वत:ची मुलगी व मुलाची गळा अावळून हत्या केली. तसेच मोठ्या मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रकार पत्नीच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने तत्काळ मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत गळा अावळलेल्या दाेघांचा मृत्यू झाला, तर तिसऱ्या मुलीवर उपचार सुरू अाहेत. दरम्यान, या कृत्यानंतर अाराेपी बापानेही अंगावर पेट्राेल अाेतून अात्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.  
 
सुनील निवृत्ती बेलदार याने गुरुवारी अापली पत्नी अनिता हिला बाहेर पाठवले हाेते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याने आपल्या ‘ऋणानुबंध’ या बंगल्यातच संजीवनी (वय १४) या मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला, तर वैष्णवी (वय १०) आणि देवराज (८)  या दाेन निरागस मुलांची दोरीने गळा आवळून हत्या केली. दरम्यान, काही वेळाने परतलेल्या पत्नीला हे दृश्य पाहून धक्काच बसला. तिने तातडीने मुलांना रुग्णालयात दाखल केले. संजीवनी हिची प्रकृती सुधारत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, सुनीलने हे कृत्य का केले त्याचा अद्याप उलगडा झालेला नाही.  

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सुनीलच्या घरात सर्वत्र झोपेच्या गोळ्या सांडलेल्या दिसून अाल्या, तर आतल्या खोलीत दाेन स्टूल एकमेकांवर ठेवलेले हाेते. त्यावर पेट्रोलने भरलेली बाटली आढळून आली, तर छताला गळफास घेण्यासाठी दोरी बांधलेली होती. यातूनच सुनीलचा गळफास घेण्याचा हेतू असल्याचाही अंदाज वर्तवला जात अाहे.  

माझे पप्पा कुठेयत?
निरागस वैष्णवी उपचारादरम्यान ‘माझ्या मम्मीला बोलवा....’ म्हणून रडत होती. तर ‘माझे पप्पा कुठेयत’ अशी विचारणाही ती करत हाेती. तिची अार्त हाक एेकून रुग्णालयातील इतर रुग्णांच्याही डाेळ्यात पाणी अाले हाेते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...