आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दाेन मुलांचा गळा घाेटणाऱ्या बापाचाही मृत्यू; घरगुती वाद, अार्थिक तणावातून हत्या केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पत्नी घराबाहेर असल्याची संधी साधून अापल्याच मुलगा व मुलीचा गळा घाेटून खून करणाऱ्या नराधम बापाने स्वत:लाही जाळून घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला हाेता. तसेच तिसऱ्या मुलीलाही अाैषधांच्या गाेळ्या घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र सुदैवाने ती बचावली. नाशिक राेड भागातील जगताप मळा परिसरात गुरुवारी ही घटना घडली हाेती.  दरम्यान, गंभीर भाजलेल्या अाराेपी सुनील बेलदार याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.   

याप्रकरणी त्याची पत्नी अनिता बेलदार हिच्या तक्रारीवरून सुनीलविराेधात वैष्णवी आणि देवराज या अापल्या मुलांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अाहे. पोलिस निरीक्षक अशाेक भगत यांनी सांगितले की, सुनीलला  शेअर मार्केटचा नाद होता. त्यात त्याला ताेटा झाला हाेता. त्यामुळे अापला बंगला विक्री करून अापल्याला पैसे द्यावेत, अशी मागणी ताे वडिलांकडे वारंवार करत हाेता.  याच कारणावरून त्याने आईवडिलांना मारहाणदेखील केली होती. सुनीलच्या अशा खटाटाेपामुळेच त्याच्या वडिलांनी अापला बंगला नातू देवराजच्या नावावर करणार असल्याचे सांगितले हाेते.   

सुनील विद्यार्थिनींची शिकवणीही घेत हाेता. यातूनच  एका विद्यार्थिनीसोबत त्याचे प्रेमसंबध निर्माण झाले. या दाेघांनी सुनीलची पत्नी अनिताला मारहाणही केली हाेती. त्यामुळे गेल्या दाेन वर्षांपासून अनिता अापल्या तीन मुलांसह माहेरी राहत हाेती.  मात्र सासरच्या मंडळींची समजूत काढून व अाता पत्नीला त्रास देणार नसल्याची हमी देत सुनीलने बुधवारीच अनिता व मुलांना घरी अाणले हाेते. दुसऱ्याच दिवशी सुनीलने मुलांचा जीव घेऊन स्वत:ही अात्महत्या केली.  

मानसिक संतुलन ढासळल्याने हत्या...
अाराेपी सुनील हा पदवीधर हाेता. घरीच शिकवणी घेऊन ताे पैसे कमवायचा. मात्र शेअरच्या व्यवसायात फटका बसल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे. तपासात खरे कारण लवकरच समाेर येईल, अशी माहिती पाेलिसांनी दिली.

संपूर्ण कुटुंबच संपवायचे हाेते  
सुनीलला अापले संपूर्ण कुटुंबच नष्ट करायचे हाेते. दाेन मुलांचा गळा घाेटल्यानंतर त्याने मोठी मुलगी संजीवनी हिला औषधाच्या गोळ्या दिल्या होत्या. यात ती बेशुद्ध झाली. मात्र ती मृत झाल्याचे सुनीलने गृहीत धरले हाेते. तर पत्नी अनिता बाहेर काम करीत असल्याने तिचाही बळी जाण्यापूर्वीच हा प्रकार उघड झाला.  
बातम्या आणखी आहेत...