आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिता-पुत्रांची भावविवश भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एक रिक्षाचालक व इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरील नागरिकांमुळे जणू नवे जीवनच मिळालेले निर्मलकांत तिवारी यांची बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मुलाशी भेट झाली. या वेळी दोघांनाही भावना अनावर झाल्या. अर्शूंच्या भाषेतच त्यांनी तासभर संवाद साधला.
मध्य प्रदेशातील होशंगाबादचे रहिवासी तिवारी शिर्डीहून रेल्वेने घराकडे परतताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचले. बेशुद्धावस्थेत त्यांना नेम फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानसिक अवस्था स्थिर नसल्याने ते रुग्णालयातून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर गेले. रिक्षाचालक सर्जेराव चव्हाण यांच्यासह जॉगर्स आनंद गौड, राखी गौड, जयदीप राका, अँड. अशोक नेहे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. अजय कदम, कैलास दिघे यांनी त्यांना खाण्यास देऊन पोलिस ठाण्यात नेले.
पोलिसांकडून अपेक्षाभंग झाल्याने चव्हाण यांनी शुर्शूषा केली व जॉगर्सच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉ. बी. के. तिवारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ते पहाटे पाचच्या सुमारास नाशिकला पोहोचले. जॉगर्सला फोन करून ते रुग्णालयात गेले. महिनाभरापासून शोध घेत असलेल्या वडिलांना अशा विषण्ण अवस्थेत बघून मुलाच्या भावना अनावर झाल्या. त्याने वडिलांना पदस्पर्श करीत गळाभेट घेतली. वडिलांना मदत करणार्‍या नाशिककरांचे त्यांनी पायच धरले.