आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- जन्मत:च मातापित्याने दूर केल्यामुळे त्यांच्या चेहर्यावरील हास्य कोमजलेलं.. त्यातच शारीरिक व्याधीही जडल्याने वेदनांना पारावर उरला नाही.. अशा परिस्थितीत त्यांना आधार मिळण्याची अपेक्षा तरी कशी करणार? पण नाशिकच्या आधाराश्रमातील तीन व्याधिग्रस्त अनाथ बालकांचं नशीब उजळलंय. यातील दोघांना स्पेनमधील दोन कुटुंबांनी, तर एकीला इटलीतील कुटुंबाने दत्तक घ्यायची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे यातील एक दीडवर्षीय चिमुकला येत्या मार्च अखेरपर्यंत स्पेनमध्ये रवानादेखील होणार आहे.
केअरिंग (चाइल्ड अँडॉप्शन रिसोर्स इन्फर्मेशन अँड गायडन्स सिस्टिम)ची तरतूद आल्यापासून भारतातून परदेशात शारीरिकदृष्ट्या अधू मुलं दत्तक जाण्याची ही पहिलीच घटना आहे. बालक दत्तक घेण्याविषयी पूर्वी फारशी जागृती नसल्यामुळे अनाथ बालकांना परदेशात दत्तक देण्याची पद्धत रूढ होती, परंतु त्यातून अनेक अनिष्ट गोष्टी घडू लागल्या.
या पाश्र्वभूमीवर 1984 पासून भारतातील बालके परदेशात देण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर भारतीयांमध्ये दत्तक घेण्याची वृत्ती वाढली; परंतु धडधाकट वा गोर्यागोमट्या मुलांनाच पसंती दश्रविली जाऊ लागल्याने शारीरिक आणि मानसिक व्यंग असणारी बालके वंचित राहू लागली. त्यांच्या नशिबी अनाथ असल्याचा शिक्का आयुष्यभरासाठी लागला गेला. ही बाब ओळखून दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल अँडॉप्शन रिसोर्स अँथॉरिटी’(कारा)ने मार्गदश्रक तत्त्वे ठरवून दिली. त्यात अशा बालकांच्या काळजीच्या पद्धतीत बदल करून परदेशातील नागरिकांनाही ऑनलाइन पद्धतीने भारतातील मुले दत्तक घेण्याची मुभा दिली.
मार्गदश्रक तत्त्वानुसार दत्तक जाणार
शारीरिकदृष्ट्या अपंग बालकांना सहसा कोणी दत्तक घेण्यासाठी तयार होत नव्हते. ‘कारा’च्या मार्गदश्रक तत्त्वांनुसार आता नाशिकमधील तीन बालकांना परदेशात घर मिळणार आहे, असे समन्वयक राहुल जाधव यांनी सांगितले.
नागरिकत्व मिळेल
परदेशात जेव्हा ही मुले दत्तक जातील, तेव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना तेथील नागरिकत्व प्राप्त होईल. मूल ज्याला दत्तक द्यायचे आहे त्या पालकाची पाश्र्वभूमी संबंधित देशाचे सरकार तपासून घेते त्यात आर्थिक आणि संबंधित पालकावर बाल लैंगिक शोषणाची केस नाही याचीदेखील तपासणी होते.
-सुनील अरोरा, संचालक, बालआशा ट्रस्ट, मुंबई
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.