आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Favor Of The Administration Ice Factory Work Without Permission

आरोग्याला घातक बर्फविक्रीचा 'उद्योग', कारवाईकडे दुर्लक्षच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा असो की, हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये बर्फाचा उपयोग होतोच. बर्फ तयार करणाऱ्या कारखानदारांनी पाण्याचे नमुने दर तीन महिन्यांतून अन्न औषध प्रशासनाकडून तपासून घेणे गरजेचे आहे. परंतु, असा बर्फ विकणाऱ्या कारखान्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. शीतपेय अथवा मद्यात वापरले जाणारे बर्फाचे चौकोनी खडे हेदेखील घरगुती स्वरूपात उत्पादित केले जातात. हे उत्पादकही परवानगीशिवायच हा ‘उद्योग’ करीत असताना अन्न औषध विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यावर ‘डी. बी. स्टार’चा प्रकाशझोत...
उन्हाळा आला की, आपण आपसूकच शीतपेयांकडे वळतो. उन्हात फिरताना एखादा बर्फाचा गोळेवाला दिसला की, त्या गोळ्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. थंडगार बर्फाच्या मोहात पडून आपण त्याच्याकडे वळतो. एका बर्फाच्या गोळ्यापासून झालेली सुरुवात तीन ते चार बर्फाचे गोळे खाऊनच आपली तृष्णा भागवते. तसेच रस्त्यावरून जाताना कुठे तहान लागली आणि समोर सरबताची गाडी दिसली की, आपण तिकडे वळतो अन‌् सरबत पितो. पूर्ण अंगभर घामाच्या धारा वाहत असताना बर्फाकडे कोण आकर्षित होणार नाही. बर्फ उत्पादन करणाऱ्या कारखान्यात काही ठिकाणी दर्शनी भागातच अखाद्य बर्फ म्हणून उल्लेख केलेला आहे. मग तो बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसेच बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा तो फार काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर अमोनियमचा वापर केला जाते. त्याच्या जोडीला विविध वायूंचा वापर यामध्ये होत असतो. हे सर्व वायू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतात.
बर्फ कारखान्यासमोर ‘अखाद्य बर्फ’ अशा आशयाचा फलक लावूनही लोक बर्फ आणतात आणि त्याचे गोळे विकतात. तसेच याचा वापर शीतपेयांमध्येदेखील सर्रासपणे केला जात असतो. बर्फ गोळे आणि त्याला वापरणारे रस हे आरोग्यासाठी योग्य आहे की नाही, याची आपण खातरजमा करीत नाही. अन्न औषध प्रशासन आणि महापालिकेकडून दरमहा या बर्फाची मागणी तपासणी करणे अत्यावश्यक असताना, असे होत नाही. यामुळे रस आणि बर्फ गोळे यातूनच संसर्गजन्य घटक शरीरात प्रवेश करतात आणि मग रुग्णालयात उपचार करण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. शीतपेय आणि मद्यात जे बर्फाचे चौकानी आकाराचे तुकडे वापले जातात, ते तुकडे फ्रीजमधील नसून, त्याचेही घरगुती कारखाने असतात. विशेष म्हणजे, अशा घरगुती कारखान्यांची नोंदच नसल्याचे अन्न औषध विभागाकडे तक्रार करताना दिसून आले आहे.
- अन्न औषध प्रशासनाकडून बर्फाच्या कारखान्यांची तपासणी नाही
- परवानगीशिवाय सुरू असलेल्या कारखान्यांवरही प्रशासनाची मेहेरनजर
- नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; कारवाईकडे दुर्लक्षच
अनधिकृत कारखान्यांवर छापे टाकून कारवाई
- खाद्य किंवा अखाद्य बर्फाच्या विक्रीसाठी परवाना बंधनकारक आहे काय?
कोणतेही खाद्यपदार्थ विक्री करणे साठवणे यासाठी अन्न-सुरक्षा कायदा कलम ३१ प्रमाणे परवाना घेणे बंधनकारक आहे.
- विनापरवाना बर्फ विक्री करणाऱ्यांवर काय कारवाई?
पाच अन्नसुरक्षा निरीक्षकांकडून जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अशा अनधिकृत बर्फनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून तेथील नमुने घेऊन कडक कारवाई केली जाते.
- शहरातील काही भागांत अखाद्य बर्फ विक्री केला जात आहे, याबाबत माहिती आहे काय?
शहरात अखाद्य बर्फ तसेच, अयोग्य प्रकारे तयार करण्यात आलेला बर्फ जर कुणी व्यावसायिक नागरिकांना विकत असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.

आर. एफ. कोळी, सहायकआयुक्त, अन्न औषध प्रशासन
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा शहरात अनेक विनापरवाना कारखाने बिनदिक्कतपणे सुरू ...