आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Federation Of Advertising And Marketing Entrepreneurs The Organization Two Days Convention Ended

ग्राहकहिताचा चढता आलेख व्यावसायिकांच्या हिताचाच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ग्राहकांच्या हितामध्ये व्यावसायिकांचे हित सामावलेले असते, असे प्रतिपादन मोना अॅडव्हर्टायझिंगचे राहुल शिलेदार यांनी केले. फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग आँत्रप्रन्यूर्स (फेम) या संस्थेच्या दोनदवसीय अधिवेशनाचा समाराेप रविवारी (दि. ५) शहरातील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झाला. त्यावेळी ते ‘व्यवसायातील गुपिते’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी त्यांनी ‘नफा का कमवावा आणि तो कशा प्रकारे कमवावा?’याबाबत मार्गदर्शन केले. जेवढी ग्राहकांच्या प्रगतीचा आलेख उंच तेवढेच आणि त्यामध्येच आपले हित अधिक असल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यवसायाच्या पुरेशा विस्तारासाठी आणि वृद्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करतोच. मात्र, आपल्या उत्पादनाचा खप वाढण्यासाठी िकंवा सेवांचा विस्तार करण्यासाठी जाहिरातींसाठी नवनवीन माध्यमांचा वापर करून ग्राहकांची प्रगती कशी करता येईल, याचा देखील विचार व्हावा, या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या अधिवेशनात सकाळच्या सत्रात शेल्स अॅडव्हर्टायझिंग इंक इंडिया आणि ‘यूएई’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भागीदार संजय अरोरा यांनी ‘ब्रॅण्ड बिल्डिंग, प्रमोशन’ या विषयासंदर्भात मार्गदर्शन करताना ब्रॅण्डचे महत्त्व स्पष्ट केले. लीड फॅसिलिटेटर, बेंचमार्क मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे राजेश खामकर यांनी ‘विक्री कौशल्य’ या विषयावर प्रभावी सादरीकरण करून, विक्री प्रतनििधी (सेल्समन) देशाची आर्थिक स्थिती बदलू शकतात, असा महत्त्वपूर्ण विचार यावेळी मांडला. आपल्याला व्यवसायात कोणत्याही टप्प्यावर आलेली कोणत्याही प्रकारची समस्या एक आव्हान म्हणून आणि संधी म्हणून स्वीकारा, नावीन्यपूर्ण काही आणले नाही, तर बदलत्या काळात टिकून राहणे अवघड असल्याचे ते म्हणाले.
माणूस आळशी नसून त्याचे ध्येय आळशी असते. त्यामुळे आपला ‘गोल’ निश्चित केल्यास काम करण्यास आपोआप उत्साह येईल. परिपूर्ण होण्याची वाट पाहत बसू नका, जगात कोणीच कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकात काही तरी कमतरता असतेच, त्याचप्रमाणे त्यांनी विपणनासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.

दरम्यान, ‘फेम’च्या या परिषदेचे यजमान असलेल्या नाशिक अॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन (नावा)च्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आल्याने ‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी ‘नावा’चे अध्यक्ष रवी पवार यांच्यासह सर्व सदस्यांचे आभार मानले. या परिषदेत निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीत सचिवपदी संदीप जव्हेरी, सहसचिवपदी विकास रायमाने, कोषाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी यांचाही समावेश आहे. संघटनेचा कार्यविस्तार राज्यभर करून संघटनेची ताकद वाढविण्याचा मनोदय या वेळी पाटील यांनी व्यक्त केला. समारोपापूर्वी झालेल्या फेडरेशनच्या निवडणुकीत ही निवड करण्यात आली.
‘नावा’तर्फे संस्थापक मोतीराम पिंगळे, सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, उपाध्यक्ष मंगेश खरवंडीकर, मिलिंद कोल्हे पाटील, खजनिदार अमोल कुलकर्णी, कार्याध्यक्ष राजेश शेळके, जनसंपर्क संचालक दिलीप निकम, संघटक प्रवीण चांडक, विठ्ठल राजाेळे, संचालक प्रवीण मोरे, गणेश नाफडे, अनिल अग्निहोत्री, सचनि गिते, नितीन राका, संजय न्याहारकर, सतीश बोरा, अभिजित चांदे, दिनेश गांधी, सुभाष लगली, सुनील महामुनी, श्रीकांत नागरे, नितीन शेवाळे, शैलेश दगडे, मनोज अहिरे, किरण पाटील, महेश कलंत्री, किशोर अग्निहोत्री, ओंकार पिंगळे आदींनी परिषद यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

अध्यक्षपदी अमरदीप पाटील
फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग आंत्रप्रन्यूर्स (फेम)च्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील अमरदीप पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी नाशिकचे मोतीराम पिंगळे पुणे येथील विनीत कुबेर यांची निवड करण्यात आली.
..या शहरांतून सदस्य सहभागी
जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांतून शंभरावर नामांकित जाहिरात व्यावसायिक परिषदेत सहभागी झाले होते.