आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलाेशिप ‘याेग’ अाराेग्य विज्ञान विद्यापीठाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - याेग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत महाराष्ट्र अाराेग्य विज्ञान विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून याचा एक भाग म्हणून डाॅक्टर्ससाठी एक वर्षाची फेलाेशिप सुरू केली अाहे. एक वर्ष कालावधीच्या या फेलाेशिपसाठी अाजवर देशभरातील तब्बल १०० डाॅक्टर्सनी नाेंदणी केली अाहे. याशिवाय विद्यापीठाच्या वतीने याेग विषयात दाेन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून २०१७ पर्यंत या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचे नियाेजन सुरू झाले अाहे. आंतरराष्ट्रीय याेग दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात अाहे.

अाराेग्य विज्ञान विद्यापीठामार्फत याेग अभ्यासक्रम सुरू व्हावा या दृष्टीने सहा वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू झाले हाेते. मृदुला फडके यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात या प्रयत्नांना जाेर अाला हाेता. परंतु कालांतराने अभ्यासक्रमाविषयीच्या संपूर्ण चर्चेला विराम मिळाला हाेता. त्यानंतर अभ्यासक्रमासाठीचे प्रयत्नच बंद झाल्याने या महत्त्वाकांक्षी िनर्णयाची अंमलबजावणी हाेण्याच्या अाधीच ताे मागे पडला. परंतु तत्कालीन कुलगुरू डाॅ. अरुण जामकर यांनी याेग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. या प्रयत्नातून काही महिन्यांपूर्वी याेगासाठी एक वर्षाची स्वतंत्र फेलाेशिप देण्याची याेजना सुरू करण्यात अाली. या अभ्यासक्रमाला पहिल्याच वर्षी जाेरदार प्रतिसाद मिळाला असून देशातील शंभर डाॅक्टर्सनी फेलाेशिपसाठी नाेंदणी केली अाहे. नाशिक येथील याेग विद्याधाम अाणि लाेणावळा येथील कैवल्यधाम या संस्थांच्या माध्यमातून डाॅक्टर्सना विद्यापीठाची फेलाेशिप मिळत अाहे.

याेग शिक्षकांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम : याेगाचा २ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत अाहे. महत्त्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम वैद्यकीय शाखेच्या सर्वच पॅथींसाठी असेल. सन २०१७ पर्यंत हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार अाहेत.

२०१७ पर्यंत कोर्स
याेग विषयाचे सखाेल शिक्षण घेण्यासाठी ही फेलाेशिप अाहे. त्याचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी व बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक असल्याने विद्यापीठाने हे पाऊल उचलले अाहे. २०१७ पर्यंत याेगाचे अन्य अभ्यासक्रम(कोर्स) सुरू हाेतील. - डाॅ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र अाराेग्य विज्ञान विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...