आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खतनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरू करा; राज यांचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा नाशिकमधील प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे अादेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी महापाैर स्थायी समिती सभापतींना दिले. शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाई नाशिक’च्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी हा विषय समजावून सांगितल्यानंतर राज ठाकरे यांनी हे अादेश दिले.
शहरातील कचरा डेपाेची देखभाल याेग्य प्रकारे झाल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवर राष्ट्रीय हरित लवादाने शहरावर काही अटी लावल्या अाहेत. त्यामुळे एक वर्षापासून येथील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला अाहे. या पार्श्वभूमीवर क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील काेतवाल यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकाऱ्यांनी राज यांची त्यांच्या मुंबईतील ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महापाैर अशाेक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, नगरसेवक राहुल ढिकले हेदेखील उपस्थित हाेते.

राष्ट्रीय हरित लवादाच्या अटींमुळे नाशिकमधील बांधकामांना पूर्णत्वाचे दाखले घेणे अशक्य झाले अाहे. पालिकेकडे सुमारे तीन हजार अशी प्रकरणे प्रलंबित अाहेत. याचा फटका बांधकाम व्यावसायिकांसह या व्यवसायाशी निगडित असलेल्या सर्वच लहान-माेठे व्यवसाय, मजूर, व्यावसायिक, वित्तीय संस्था ग्राहकांनाही बसत असून, एेन सणासुदीतही मंदीसदृश स्थिती असल्याकडे अध्यक्ष सुनील काेतवाल यांनी ठाकरे यांचे लक्ष वेधले. घनकचऱ्याची जबाबदारी महापालिकेची असून, ती याेग्य प्रकारे सुरू झाल्यानंतरही राष्ट्रीय हरित लवादाकडून सहा महिने पाहणी करून खात्री झाल्यावरच त्या अटींतून मुक्ती मिळणार अाहे. शहरातील अार्थिक उलाढाल अाणि विकास सुरू राहावा, यासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची गरज अाहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प त्वरित सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे असून, शहराचे ब्रँडिंग, प्रमाेशन या विषयाप्रमाणेच कचरा व्यवस्थापनाबाबतही क्रेडाई महापालिकेस सहकार्य करण्यास तयार असल्याचेही सांगितले.
राज ठाकरे यांनी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेले म्हणणे समजावून घेऊन महापाैर, स्थायी समितीचे सभापती यांच्याशी याबाबत चर्चा केली खत प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे अादेश दिले. या बैठकीत क्रेडाईकडून सचिव उमेश वानखेडे, कार्यकारिणी सदस्य रवी महाजन, सुनील गवांदे, अनिल अाहेर, शंतनू देशपांडे, सचिन बागड उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...