आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खत प्रकल्प निविदा मंजूर; सहा महिन्यांमध्ये सुधारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या खत प्रकल्पाच्या खासगीकरणाची निविदा गुरुवारी (दि. १३) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात अाली. राष्ट्रीय हरित लवादाने घेतलेल्या अाक्षेपानुसार खत प्रकल्पात येत्या सहा महिन्यांत पूर्णत: सुधारणा करण्यात येतील, असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. या सुधारणांनंतर बांधकाम परवानग्यांचा मुद्दा मार्गी लागणार अाहे.
नाेव्हेंबर २०१५ मध्ये खत प्रकल्पाच्या दुर्दशेवरून राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानगी पूर्णत्वाच्या दाखल्यावर निर्बंध लादले. परिणामी, अाधीच मंदीचा सामना करणाऱ्या शहरातील विकसकांची काेंडी झाली. केवळ विकसकच नव्हे, तर सर्वसामान्य ग्राहकांनाही त्याचा माेठा फटका बसला. त्यामुळे अाता संपूर्ण खत प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. यासंदर्भातील प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात अाली.

दिनकरपाटील यांच्यावर शरसंधान
खत प्रकल्पाची निविदा जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात असल्याचा अाराेप भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला हाेता. त्यानंतर स्थायी सभापती सलीम शेख यांनी खुलासा करीत पाटील यांनीच प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केल्याचे पुढे अाणले हाेते. गुरुवारच्या सभेतही या मुद्यावरून चर्चा झाली. प्रारंभी पाटील यांनी थेट मनसेवर शरसंधान साधत चार वर्षांत काेणतीही कामे या पक्षाने पूर्ण केली नसल्याची टीका केली. भाषण झाल्यानंतर ते बैठक अर्धवट साेडून मुंबईला गेले. ते गेल्यानंतर मात्र लक्ष्मण जायभावे, मनीषा हेकरे, प्रकाश लाेंढे यांनी पाटील यांच्यावर झाेड उठवत एका दिवसात त्यांनी अभ्यास कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सभापती शेख यांनी मनसेची बाजू लढवत मुकणे धरण अाणि घंटागाडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मनसेच्या सत्ताकाळातच मंजूर झाल्याचे सांगितले. खत प्रकल्प केव्हा अाणि काेणाच्या काळात मंजूर झाला, याचाही अभ्यास करा असा टाेला यावेळी सभापतींनी मारला.

सहामहिन्यांत सुधारणा
^खतप्रकल्पाच्या निविदेत समाविष्ट तरतुदींप्रमाणे येत्या सहा महिन्यांच्या काळात संबंधित ठेकेदार प्रकल्पाचा कायापालट करणार अाहे. राष्ट्रीय हरित लवादाला अपेक्षित बाबींप्रमाणे प्रकल्पाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात येईल. सध्या असलेल्या यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करून त्याचा वापर करण्यात येईल. त्याचप्रमाणे अाता खतावर व्यवस्थित प्रक्रिया करण्यात येईल. -यु. बी. पवार, अधीक्षक अभियंता

बैठकीतील महत्त्वाच्या सूचना
{ खत प्रकल्पात वनाैषधी वनस्पतींची लागवड करावी : प्रकाश लोंढे
{ खत प्रकल्पातील ६९ कर्मचारी स्थलांतरित करावेत : यशवंत निकुळे
{ सहा महिन्यांच्या अात खत प्रकल्पात सुधारणा करावी : दिनकर पाटील
{ प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर तातडीने कमी करावे : अशाेक सातभाई
{ घंटागाडीत माती अाढळल्यास दंडात्मक कारवाई करावी : मनीषा हेकरे
बातम्या आणखी आहेत...