आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध अाकर्षक ‘अॅाफर्स’ची नवरात्राेत्सवामध्ये रेलचेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साेनेखरेदीवर लक्झरियस कारचे बक्षीस जिंकण्याची संधी, तर कारच्या खरेदीसाठी अगदी शंभर टक्क्यांपर्यंत उपलब्ध असलेले अर्थसाहाय्य, दुचाकी खरेदीला किमान डाउनपेमेंटची याेजना किंवा इलेक्ट्रिकल हाेमअप्लायन्सेसवर नवरात्राेत्सवाच्या पार्श्वभूमीवर अाकर्षक अाॅफर्सची रेलचेल बाजारात अाहे. यामुळे बाजारातही चैतन्य संचारल्याचे वातावरण असून, नाताळपर्यंत सलग सुरू राहणाऱ्या सणांची पर्वणी ‘कॅश’ करण्यासाठी विविध कंपन्या, वित्तसंस्था, वितरक, व्यावसायिक सरसावल्याचे दिसते.

अाकर्षक अाॅफर्स देण्यास कंपन्यांनी सुरुवात केली असून, सराफी पेढ्या, वाहन विक्री दालने झळाळली अाहेत. काही महिन्यांपासून काहीसे थंड असलेले रिअल इस्टेटचे व्यवहारही बहरत असल्याचे चित्र अाहे. काही सराफी पेढ्यांनी थेट लक्झरियस कारच्या बक्षिसांचे अाकर्षण ठेवले अाहे. नवरात्राेत्सवाचा मंगलकाळ खरेदीस महत्त्वाचा मानला जात असला तरी, दिवाळीपर्यंत खरेदीचा उत्सव सुरू राहणार अाहे. साेन्याचे भाव २७,२०० रुपये तोळ्याच्या अासपास असून, हेच दर दसरा-दिवाळीपर्यंत २७,७०० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. वाहन बाजारातही तेजीदरम्यान टाॅप गियर टाकला असून, बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळू लागला अाहे.

वित्तीय संस्थांनी उपलब्ध करून दिलेले शंभर टक्क्यांपर्यंतचे कर्ज अाणि कर्जाची सुलभता याचाही हातभार विक्रीला लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. माेटारसायकल अाणि स्कूटर प्रकारातील वाहनांची खरेदीही मुहूर्तावर केली जात असून, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या माळेसह दसऱ्याच्या मुहूर्ताला पसंती मिळत अाहे. कमीत कमी डाउनपेमेंट, जास्तीत जास्त वित्तसाहाय्य, अाकर्षक व्याजदर अशा याेजना येथेही पाहायला मिळत अाहेत.

रिअल इस्टेट क्षेत्रातदेखील उत्साहाचेच वातावरण
^रिअलइस्टेटमध्येही उत्साहाचे वातावरण असून, ग्राहकांकडून चाैकशी सुरू झाली अाहे. कमी झालेले व्याजाचे दर अाणि स्थिर दर या गाेष्टींमुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत अाहे. जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक

दसऱ्यापर्यंत तरी साेन्याचे दर घटण्याची शक्यताच नाही...
^शहरात अाजच्या घडीला २७,२०० रुपयांच्या अासपास तोळ्याचा दर सुरू अाहे. त्यात घट हाेण्याची शक्यता नसून हे दर वाढत जातील. नवरात्रासह दसरा-दिवाळीसाठी चांगली खरेदी हाेणार अाहे. नीलेश बाफना, सराफी व्यावसायिक

अाॅफर्सही लक्षवेधी; ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
^काही व्यावसायिकांनी लक्झरियस कार बक्षीस ठेवल्या असून, अशा अाॅफर्स ग्राहकांना अाकर्षित करतात. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद असून, ताे वाढत जाणार अाहे. सराफी पेढ्याही सज्ज अाहेत. मयूरशहाणे, सराफी व्यावसायिक

नवरात्राेत्सव प्रारंभापासून बुकिंगला मिळताेय प्रतिसाद
^नवरात्रापासून ग्राहकांकडून चांगले बुकिंग होत असून, कार खरेदीसाठी अाता शंभर टक्के वित्तीय साहाय्य उपलब्ध असल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत अाहे. हेच वातावरण कायम राहील. -राजेश कमाेद

बांधकाम क्षेत्रात संचारला उत्साह
गेल्याकाही महिन्यांपासून विविध अडचणींचा सामना करीत असलेले अाणि काहीअंशी शांत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रातदेखील उत्साह संचारल्याचे दिसून येते. चांगल्या मुहूर्तावर वास्तुप्रवेश करता यावा, यादृष्टीने ग्राहकांची पावले पडू लागली अाहेत. कमी झालेले व्याज स्थिर दरांमुळे सर्वत्रच सकारात्मक वातावरण पाहायला मिळत अाहे.