आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक रोजा इफ्तारचा रौप्यमहोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाच्या पार्श्वभूमीवर ठक्कर बाजार येथील सय्यद तुराब अली शाह बाबा यांच्या दग्र्यावर महिनाभर नागरिकांसाठी रोजा इफ्तारची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा असलेल्या या उपक्रमात हिंदू-मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सामाजिक एकतेचा संदेश देतात. रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांच्या दिनचर्येत मोठा बदल घडतो. पहाटे भोजनाची वेळ र्मयादित असते. त्याला ‘सहेरी’ असे म्हणतात. सूर्यास्तानंतर घेतल्या जाणार्‍या फलाहाराला ‘इफ्तार’ म्हणतात. ठक्कर बाजार परिसरातील जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, नाशिक-कसारा टॅक्सी थांबा, मध्यवर्ती बसस्थानक, सेंट्रल मॉल, राजदूत हॉटेल परिसर ही वर्दळीची ठिकाणे आहेत.
रुग्णालयात येणारे नातेवाईक, प्रवासी, टॅक्सीचालक-मालक व मॉलमधील कर्मचारी वर्गाची गैरसोय होऊ नये व त्यांना रोजा इफ्तार करता यावा, म्हणून नासीर खान पेंटर यांनी येथील दग्र्यात पंचवीस वर्षापूर्वी रोजा इफ्तारचा पायंडा पाडला. त्यांच्या निधनानंतर सामाजिक कार्याची आवड असलेले रिजवान खान यांनी आपल्या वडिलांचा हा उपक्रम आजतागायत सुरू ठेवला आहे.
रोजा इफ्तारच्या वेळी या ठिकाणी खाद्यपदार्थांची व्यवस्था समितीच्या वतीने केली जाते. नागरिकांना पुन्हा जेवणासाठी घरी जावे लागू नये म्हणून भोजनामध्ये शाकाहारी व मांसाहाराचाही समावेश असतो. या उपक्रमात कसारा टॅक्सीचालक संघटनेची मदत लाभते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जफर खान, इकबाल अत्तार, हनीफ पठाण, जाकीर खान, मुदस्सर खान यांच्यासह समितीचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात.