आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भलिंग चाचणीचे दोन सेंटर ‘सील’ शेगावमध्ये दक्षता पथकाकडून कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चाचणी करणाऱ्या दोन खासगी दवाखान्यांचा दक्षता पथकाने पर्दाफाश केला. अहमदनगर आणि शेगाव येथे पथकाने ही कारवाई केली. दलालांमार्फत बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. संशयितांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
आरोग्य उपसंचालक नाशिक मंडळाचे डॉ. बी. डी. पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव, अहमदनगर येथे काही डॉक्टर दलालांच्या मदतीने गर्भलिंग चाचणी करत होते. दक्षता अधिकारी अॅड. एस. सी. खर्डेकर, दौलतराव मोरे, अॅड. एम. वाय. मुंडे यांच्या पथकाने डॉ. काकडे यांच्या दवाखान्यात सापळा रचला. बातमी फुटल्याने साईपुष्प दवाखाना, शेगाव येथे बनावट रुग्ण पाठवण्यात आले. दलालामार्फत ३५ हजार घेऊन डॉ. प्रल्हाद पाटील यांना देण्यात आले. गर्भलिंग चाचणी करण्याचे सांगण्यात आले. डॉ. यशवंत पांडुरंग नजन, सोनल नजन गर्भलिंग चाचणी करताना अाढळून आले. पथकाने शेगाव पोलिसांच्या मदतीने डॉ. प्रल्हाद पाटील, संगीता खडांगळे (आया) यांना शेगाव पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.