आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक - दांडियामध्‍ये काढली मुलींची छेड, युवकांमध्‍ये तुफान हाणामारी, दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात दांडियादरम्यान हाणामारी आणि दगडफेकीची घटना गुरुवारी रात्री 11 वाजता घडली आहे. यामध्ये पोलिसासह 3 जण जखमी झाले असून ही दुसरी घटना आहे. पंचवटी परिसरातील मायको हॉस्पिटल जवळील भागात हा प्रकार घडला आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंचवटी भागातील मायको हॉस्पिटलजवळील भागात एका दांडिया खेळण्याचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी बाहेरून आलेल्‍या काही मुलांनी येथील मुलींची छेड काढली. त्यानंतर लगेच तेथे मुलांचे दोन गट समोरासमोर आले नि हाणामारीस सुरूवात झाली. काही वेळातच या ठिकाणी उभ्‍या असलेल्‍या वाहनांची तोडफोड करण्‍यात आली. परिसरात दगडफेक करण्‍यात आली. या घटनेत 3 जणांसह राजू गुंजाळ हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू आहेत. उपचार सुरु आहे. अशाच प्रकारचे पंचवटी येथील निलगीरी बाग परिसरात दोन गटात मारहाण आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेला दोनच दिवस पूर्ण झाले पुन्‍हा पंचवटीतच हाणामारी झाली. या दोन्‍हीही घटनांमुळे परिसरातील उत्‍सवामध्‍ये तणावाचे वातावण निर्माण झाले आहे.
पहिली घटनेत कारचालकावर हल्‍ला
दांडिया खेळून आलेल्या तीन तरुणांना दांडिया खेळून झाला का, असे विचारणाऱ्या कारचालकावर टोळक्याने शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, वाहनांवर दगडफेक केल्‍याचे फोटो..