आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावाच्या घटनांनी नाशिककर भयभीत, औरंगाबादरोडवर भिडले दोन नेत्यांचे समर्थक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात आठ दिवसांपासून वाहनांची तोडफोड आणि टवाळखोरांच्या कारवाया अचानक वाढल्याने नाशिककर भयभीत आहेत. रविवारी (दि. १०) रात्री औरंगाबाद रोडवर भाजप काँग्रेस नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने परिसरात दहशत आहे. टवाळखोरांवर वचक नसल्याने घटना वाढल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात आहे.
औरंगाबाद रोडवर हॉटेल मिर्चीमध्ये काँग्रेस नगरसेवक उद्धव निमसे आणि भाजप नेते तथा हॉटेल संचालक सुनील बागुल यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही बाजूने दगडफेक, हॉकी स्टिक आणि लाठ्याकाठ्यांचा मुक्त वापर झाला. काही संशयितांनी हत्यारे काढल्याची चर्चा आहे. आडगाव पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही नेत्यांच्या समर्थकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. योगेश साळुंके ड्रेनेज साफ करत असताना देवीदास निमसे याच्या कार एमएच १५ डीसी ४०१४ ला पाइप लागल्याच्या किरकोळ कारणाहून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.
हॉटेलवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. साळुंकेच्या फिर्यादीनुसार देवीदास निमसेसह २०-२५ जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करून तोडफोड केली, तर निमसेच्या फिर्यादीनुसार साळुंके, निखिल वाघ, सुदाम सोनवणे लक्ष्मण गोसावी इतर २० जणांनी गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर निमसे आणि बागुल समर्थकांमध्ये हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच उपनगर भागात वाहनांची तोडफोड झाली होती. वर्गणीच्या वादातून तरुणाचा खून झाला होता.
वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ
औरंगाबादरोडवरील या प्रकारानंतर पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्त घटनास्थळी जाणे अपेक्षित होते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांची समजूत काढत वाद मिटवला.
टवाळ खोरांचा उद्रेक वाढला
सिडको,सातपूर, पंचवटी, आडगाव, औरंगाबादरोड या भागा रात्री उशिरापर्यंत टवाळखोर बसून असतात. यांच्याकडून घातक कृत्य घडवले जात असल्याचे सांगितले जाते.
‘पाहून घ्या, आलो’
साहेबरावपाटील, गणेश शिंदे तत्काळ घटनास्थळी पोहोचत. सध्या घटनेची माहिती दिल्यास ‘पाहून घ्या, मी येतोच’ असे सांगत असल्याची चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...