आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fighting To Drought With All Powers : Chief Minister

दुष्काळ निवारणासाठी सर्व शक्तीनिशी सामना : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मागेल तिथे पाण्याचे टॅँकर, रोजगार व आवश्यक तिथे जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या असून, दुष्काळ निवारणासाठी सर्व शक्तीनिशी मुकाबला केला जात असल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केला. त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी सर्मथ गुरुपीठ प्रकल्पाच्या अद्यावत रुग्णालयाच्या वैधतेबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे जाहीर आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय र्शी स्वामी सर्मथ गुरुपीठ येथे दुष्काळ निवारण अभियान अंतर्गत जनावरांसाठी 108 ट्रक चारा व 108 पाण्याच्या टाक्या राज्य शासनास प्रदान करण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते. गुरुपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण, लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, राज्यमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी विलास पाटील आदी उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले, 1972 नंतर पहिल्यांदाच एवढी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पाण्याची बचत केली पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे युवा वर्ग भरकटत असून, येथील संस्कार केंद्रातून खर्‍या अर्थाने संस्कृती रक्षणाचे कार्य केले जात आहे. संस्कृती आणि संस्कारांचे मूल्य जोपासण्याबरोबरच राष्ट्रभक्ती निर्माण करून देश समृद्ध करण्याचे केंद्राचे कार्य महान असल्याचेही ते म्हणाले. गुरुपीठातर्फे एक हजार खाटांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा संकल्प आहे. मात्र, या जागेच्या परवानग्या देण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी मंत्रिगण व सेवेकरांची मागणी आणि आदिवासी भागाला वरदान ठरणार्‍या या रुग्णालयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शासनाकडून कुंभमेळ्यासाठी 300 कोटी रुपये नाशिकला व 40 कोटी रुपये त्र्यंबकेश्वरसाठी पहिल्या टप्प्यात दिले जात असून, चार समित्या स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. अण्णासाहेब मोरे म्हणाले, वाढदिवसाचे सोहळे साजरे करण्यापेक्षा दुष्काळी भागातील जनावरांना चारा, पाणी देण्यासाठी पुढे आले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. गुरुपीठाच्या रुग्णालयातर्फे सिंहस्थकाळात 365 दिवस डॉक्टर मोफत उपचार करतील, अशी घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुपीठाच्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले.

रुग्णालयाच्या तांत्रिक अडचणींचा सूर : दुष्काळ निवारणासाठी मदत करण्याच्या या सोहळ्यात सर्वच मंत्री, नेत्यांच्या भाषणात गुरुपीठाच्या रुग्णालय बांधकामात येणार्‍या अडचणी दूर करण्याचा सूर होता. खासदार मुंडे म्हणाले, मी 35 वर्षांपासून सेवेकरी आहे. सामान्य माणसातील अंधर्शद्धा दूर करण्याचे आणि जन्माने कोणीही र्शेष्ठ, कनिष्ठ नसून कोणीही कुठलेही काम करू शकतो, हा माणुसकीचा मंत्र केंद्राने सर्वांना दिला. केंद्रातील संस्काराने समाजाला दिशा दिली. दुष्काळी परिस्थितीतही जनावरांना चारा, व्याकूळलेल्यांना पाणी देण्यासाठी टाक्या देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. जे रुग्णालय उभे केले जात आहे, त्याच्या बांधकामात येणार्‍या अडचणी शासनाने दूर कराव्यात, यावर स्वाक्षरी करणार्‍या कुठल्याही मंत्र्याला विरोधी पक्ष अडचणीत आणणार नाही, आपला आणि पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असे जाहीर केले. या पाठोपाठ पालकमंत्री भुजबळ यांनीही रुग्णालयाचे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी शासनाकडून मदत केली जाईल. रुग्णालयाचे तातडीने काम सुरू झाल्यास सिंहस्थात भाविकांसाठी सोय उपलब्ध होऊ शकते असे सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही सेवामार्गाचे व्रत घेतलेल्या या गुरुपीठामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध असे रुग्णालय उभारण्यात येत आहे. येथे दवाबरोबरच दुवाही मिळणार असल्याने रुग्णालयाच्या पूर्णत्वासाठी सर्वपक्षीय मदतीबरोबरच सरकारकडूनही तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रास्ताविकात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही शक्ती आणि भक्तीचा अपूर्व असा योग गुरुपीठामार्फत घडवून आणण्यात आला आहे. केंद्रातर्फे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि परदेशातही संस्कार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गुरुपीठामार्फत उभारण्यात येणार्‍या 35 कोटी रुपयांच्या रुग्णालयाच्या जागेचा ‘प्रादेशिक उद्यान आराखड्याचा’ प्रश्न निर्माण होत आहे. ही अडचण मुख्यमंत्र्यांनी दूर केल्यास ग्रामीण भागात रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध होऊ शकते, अशी मागणी केली.