आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाहातापायाच्या ‘ती’मध्ये अात्माही अाणता येणार परत, पोलिस घेणार \'त्‍याची\' मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हात-पाय नसलेली ‘ती’ एमअायडीसीच्या प्रादेशिक कार्यालयातून जशी अचानक गायब झाली तशीच अनाहूतरित्या पुन्हा कार्यालयात येऊन एका टेबलावर विराजमानही झाली... अाणि अाता तिचा अात्माही परत अाणण्याची संधी चालून अाली अाहे.
 
कारण, एका उद्याेजकाने २३ जानेवारी २००९ लाच संबंधित कागदपत्रे माहिती अधिकारातून मिळविलेली हाेती, असे सांगितले जात अाहे. त्यामुळे गहाळ झालेली १९२ पानेच परत अाणून ठेवलेल्या पाकिटात अाहेत, की दुसरीच कागदपत्रे या पाकिटातून ठेवण्यात अाली, याची शहानिशा पाेलिसांना करता येऊ शकते अशी चर्चा अाता सुरू झाली अाहे. दरम्यान, या प्रकरणाची चाैकशी गुरुवारपासून (दि. ११) सुरू हाेत अाहे.
 
या बहुचर्चित फाइलमधील कागदपत्रे गहाळ झाल्यानंतर पाच महिन्यांनी पुन्हा कार्यालयात काेणीतरी अाणून ठेवल्याचा प्रकार सध्या उद्याेेग वर्तुळासह एमअायडीसी कार्यालयात माेठ्या चवीने चघळला जात अाहे. या प्रकरणातील कागदपत्रे नेमकी काेणती हाेती अाणि ती बदलण्यात अाली काय, याचा तपास करण्यासाठी ‘त्या’ उद्याेजकाची मदत पाेलिसांना घेता येऊ शकते, असे बाेलले जात अाहे.
 
सातपूर अाैद्याेगिक वसाहतीतील इ-१ ते इ-४ या भूखंडांशी संबंधित या प्रकरणी एमअायडीसीने सातपूर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली असून, या चाैकशीत माहिती अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे सहाय्यभूत ठरू शकतात. एमअायडीसीतील तीन संबंधित कर्मचाऱ्यांना सकाळी १० वाजता पाेलिस ठाण्यात हजर राहाण्याचे अादेश पाेलिसांनी बजावले अाहेत. तसेच, काही उद्याेजकही पाेलिस अायुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाचा छडा लागावा, यासाठी साकडे घालणार अाहेत. यामुळे अाता पाेलिस या प्रकरणाचा कसा तपास करतात अाणि त्यामागील सूत्रधार शाेधण्यासाठी अापले कसब कसे पणाला लावतात, याची उत्सुकता उद्याेगवर्तुळाला लागून अाहे.
 
..तर पाेलिसांना हाेईल तपासात मदत
एकाउद्याेजकाने या फाइलमधील कागदपत्रे माहिती अधिकारात २००९ मध्येच मिळविलेली असल्याची खात्रीलायक माहिती अाहे. त्यामुळे गहाळ झालेल्या १९२ पानांच्या क्रमांकावरून माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांशी पडताळणी करता येऊ शकते. काेणती कागदपत्रे गहाळ झाली त्यामुळे काेणाचा फायदा हाेणार हाेता, हे स्पष्ट हाेण्यास यामुळे मदत मिळेल खऱ्या गुन्हेगाराकडे पाेलिसांना माेर्चा वळविता येईल.
बातम्या आणखी आहेत...