आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज भरा, नंतरच स्वस्त धान्य, नागरिकांची होतेय गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, धान्य मिळण्यासाठी तीनदा अर्ज भरूनही पुन्हा नव्याने शिधापत्रिकाधारकांकडून सर्व कागदपत्रांची मागणी करून अर्ज भरून घेतले जात आहेत. अर्जाची अंतिम मुदत ३० ऑगस्ट असून, दबाव टाकून त्वरित अर्ज भरून देण्याची मागणी होत असल्यामुळे रेशन बंद होईल, या भीतीने अनेक शिधापत्रिकाधारक धास्तावले आहेत.

एकीकडे स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन बायोमॅट्रिक्स प्रणाली सुरू करण्याचा विचार करीत आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांकडून वारंवार अर्ज भरून घेतले जात असल्याने नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, जुने नाशिक, जेलरोड, देवळालीगाव या परिसरात रेशन दुकानदार आणि शिधापत्रिकाधारक यांच्यात वादावादी होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व अर्ज धान्य पुरवठा विभागाने भरायचे असूनदेखील ते रेशन दुकानदारांकडे दिले जात आहेत. याविरोधात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील दिले आहे. परंतु, पुरवठा विभागाने दादागिरी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे अन्न-धान्य सुरक्षा कायद्यानुसार नागरिकांना धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असा नियम असूनही काही रेशन दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यापासून वंचित ठेवत आहेत.

हक्कापासून वंचित..
जिल्हापुरवठा विभागाने सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देऊन त्यांना हक्कापासून वंचित ठेवू नये. सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रशासन असून, त्यांनी नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात. सुनीलदेवकर, प्रसदि्धिप्रमुख, शिवसेना, नाशिकरोड

विनाकारणहोताहेत वाद
अर्जभरून देणे हे दुकानदारांचे काम नसूनदेखील अधिकारी दुकानदारांकडून अर्ज भरून घेत आहेत. त्यामुळे विनाकारण दुकानदार नागरिकांमध्ये वाद होत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील दिलेले आहे. निवृत्तीकापसे, जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना
तरीहीसुधारणा नाहीच

वारंवारअर्ज भरून घेतले जात असल्याने सरकारी कामाचा अनुभव वाईट असल्याचे सातत्याने जाणवत आहे. सरकार बदलले, तरी कोणतीही सुधारणा झाल्यासारखे वाटत नाही. बापूखोले, नागरिक
अर्ज मिळत नाहीत, तोपर्यंत धान्य बंद

जोपर्यंतदुकानातील शिधापत्रिकाधारकांचे अर्ज मिळत नाहीत तोपर्यंत कोणतेही धान्य मिळणार नाही, अशी भूमिका जिल्हा पुरवठा विभागाने घेतली आहे. त्यामुळे सध्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचा तुटवडा दिसून येत आहे. दुसरीकडे यापूर्वीच तीन वेळा अर्ज भरूनही पुन्हा भरून घेतले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत योग्य कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अर्जांसाठी नागरिकांकडून वारंवार घरातील व्यक्तींचे दोन फोटो, रेशनकार्ड, गॅसकार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक आदींच्या झेरॉक्सची मागणी केली जात आहे. बहुतांश शिधापत्रिकाधारक निरक्षर असल्याने त्यांना अर्ज भरण्यासाठी साक्षर व्यक्तींची शोधाशोध करावी लागत आहे.