आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्यांना वार्षिक विवरणपत्र अाॅनलाइन भरणे अनिवार्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वार्षिक विवरणपत्र (नमुना २७) सादर करण्यासाठी अाॅनलाइन प्रणाली विकसित करण्यात अाली असून, कारखाने अधिनियम १९४८ अंतर्गत नाेंदणीकृत असलेल्या कारखान्यांच्या भाेगवटधारकांनी अथवा व्यवस्थापनाने यापुढे अाॅनलाइन प्रणालीवरच नमुना २७ सादर करावे, असे अावाहन अाैद्याेगिक सुरक्षा अाराेग्य संचालनालयाचे सहसंचालक मधुकर प्रभावळे यांनी केले अाहे. 

महाराष्ट्र कारखाने नियम १९६३ च्या नियम ११९ (१) प्रमाणे कारखानदारांना वार्षिक विवरणपत्र सादर करणे अनिवार्य अाहे. यापूर्वी नमुना क्रमांक २७ पाेस्टाद्वारे पाठविलेे जात हाेते. मात्र जानेवारी २०१७ पासून http:lms. mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नमुना क्रमांक २७ उपलब्ध अाहे. यात लाॅगीन अायडी तयार नसलेल्या कारखाने व्यवस्थापनाने परमनंट सिरियल नंबर (पीएसएन)द्वारे नाेंदणी करावी. वर्ष २०१६ ची माहिती वार्षिक विवरणपत्र नमुना क्रमांक २७ मध्ये भरण्यासाठी कारखानदार व्यवस्थापनाने अाॅनलाइन प्रणालीचाच वापर करण्याचे अावाहन प्रभावळे यांनी केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...