आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फिल्म सिटी’मुळे ‘भावली’च्या सौंदर्याला लागणार ‘चार चाँद’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केल्याने अद्वितीय नैसर्गिक सौंदर्याचे काेंदण लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम परिसराकडे पर्यटन विकास महामंडळाने लक्ष केंद्रित केले अाहे. या परिसरात वर्षभर विविध निर्मात्यांकडून चित्रीकरण हाेत असते. मात्र, त्यात वाढ व्हावी निर्मात्यांना येथे चित्रीकरणाला मदत व्हावी, या उद्देशाने ‘फिल्म सिटी’च्या संकल्पनेवर अाधारित सुविधा उपलब्ध करून दिली जाणार अाहे. याकरिता परिसरातच असलेल्या जलसंपदा विभागाची साडेचाैदा हेक्टर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न अंतिम टप्प्यात अाले अाहे. लवकरच या कामामुळे परिसराचा चेहरामाेहरा बदलणार अाहे.

निर्मात्यांकडून लाेणावळा, खंडाळा या परिसराला चित्रीकरणासाठी पसंती दिली जाते. मात्र, अाता बहुतांश निर्माते त्याच त्याच स्थळांवर चित्रीकरणाला कंटाळले अाहेत.चित्रीकरण करताना फ्रेममध्ये काहीही करा सिमेंटच्या भिंती येतातच ही देखील त्यांची एक माेठी समस्या अाहे. त्यामुळेच इगतपुरी तालुक्यात ज्या ठिकाणी चित्रीकरण केले जाते, त्यात भावली डॅमच्या परिसराला जास्त पसंती मिळते अाहे. या ठिकाणी चित्रीकरणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निर्मात्यांना अाकर्षित करता येईल. या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पाऊल उचलले.

काश्मीरप्रमाणेच साैंदर्य लाभलेल्या भावली धरण परिसरात पर्यटकांना ‘दल लेक’मध्ये शिकाऱ्यातील विहार करण्याचा अानंदही लवकरच मिळणार अाहे. याकरिताही महामंडळाने प्रयत्न सुरू केले असून, हा उपक्रम खूप खर्चिक नसल्याने लवकरच येथे पर्यटकांना शिकाऱ्यातील जलपर्यटनाचा अानंदही लुटता येणार अाहे. प्रज्ञा बढे-मिसाळ, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

सध्या निवास, न्याहारीची व्यवस्था
धरणपरिसरात सध्या अठरा बंगल्यांची बेड अॅण्ड ब्रेकफास्ट (निवास अाणि न्याहारी) याेजनेंतर्गत नाेंदणी झालेली असून, उत्कृष्ट सेवा येथून पर्यटकांना मिळत अाहे. मुंबई परिसरातून येथे येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ मिळत अाहे. या सेवेचा चित्रपटांच्या क्रु मेंबर्सला फायदा हाेणार अाहे.
इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य असलेल्या याच भावली धरण परिसरात काश्मीरच्या धर्तीवर शिकाऱ्यातून विहार करता येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...