आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या संयमी खेरला फिल्मफेअर पुरस्कार, ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्डने गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अनाेख्या अदाकारीसह ‘मिर्झिया’ या पहिल्याच बाॅलीवूड चित्रपटात छाप सोडणाऱ्या नाशिकच्या संयमी खेरने पदार्पणातच फिल्मफेअर पटकावले आहे. वेगळ्या धाटणीच्या पेहरावातून फॅशनिक आयकॉन ठरू पाहणाऱ्या संयमीला फिल्मफेअर ‘ग्लॅमर अॅँड स्टाइल अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.
फिल्मफेअर अवॉर्ड््सचा सोहळा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडला. त्या साेहळ्यात बिग बी अमिताभ बच्चन यांना ‘फिल्मफेअर स्टाइल अायकाॅन’ या पुरस्काराने गाैरविण्यात अाले. अन्य पुरस्कारार्थींमध्ये ऐश्वर्या रॉय, अलिया भट, जॅकलिन फर्नांडिस यांचादेखील समावेश अाहे.त्याबरोबरच इमर्जिंग फेस अँड फॅशन इन बॉलिवूड म्हणून संयमीचा विशेष उल्लेख करण्यात आला.

नाशिककर असलेल्या संयमीला मिर्झिया हा पहिलाच चित्रपट राकेश मेहरांच्या प्रॉडक्शनचा मिळाला. हर्षवर्धन कपूरबरोबरचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिश्मा दाखवू शकला नसला तरी चित्रपट समीक्षकांनी संयमीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले हाेते. करण जोहर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याबरोबरच अादित्य ठाकरे आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिर्झियातील भूमिकेनिमित्ताने खास ट्विट करून संयमीचे कौतुक केले हाेते.
बातम्या आणखी आहेत...