आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकाेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, सरकारी कामात अडथळा अाणल्याची फिर्याद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सरकारी कामात अडथळा अाणल्याप्रकरणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सिडकोतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मामा ऊर्फ बळीराम ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर अंबड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. सिडको प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात अालेल्या फिर्यादीनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नुकतेच सिडकोचे अधिकार महापालिकेकडे वर्ग करण्यात आले असून, पहिलाच झटका हा अतिक्रमणाबाबत देण्यात अाल्याने नागरिकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, सिडकोचे अधिकारी अनिल जनार्दन झोपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गट मार्गशीर्ष सेक्टर सी २, आयकर कॉलनी, सिडको येथे सिडको कार्यालयाच्या मालकीचा अंदाजे ७८८ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड असून, त्यावर १०० चाैरस मीटरचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त येथे व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास कायमस्वरूपी अडथळा निर्माण व्हावा म्हणून हनुमंत देवाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. हे अतिक्रमण काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी सिडको प्रशासन गेले असताना मोठा वाद निर्माण हाेऊन नागरिकांनी अतिक्रमण निर्मूलनाचे काम बंद पाडले होते. या घटनेला या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनातून अतिक्रमण उभारले गेले, त्यांना जबाबदार धरले अाहे. मामा ठाकरे यांनी हे सर्व अतिक्रमण उभारले होते. त्यामुळे सिडको प्रशासकांनी याबाबत अंबड पोलिसांत तक्रार केली होती. त्याची चौकशी होऊन ठाकरेंसह १० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात अाला.

अतिक्रमण प्रकरणी गुन्हा
सिडकोतील शासकीयजागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात अाली त्यावेळी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. त्याची चौकशी करण्यात येऊन अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. - कांचन बोधले, प्रशासक, सिडकाे
बातम्या आणखी आहेत...