आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड एमअायडीसीत थर्माकाेल कंपनीस आग, चार तासांत मिळविले नियंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - अंबड एमआयडीसीतील नीरज थर्माकॉल या कंपनीला रविवारी (दि. १) सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही क्षणांत भयावह रूप धारण केल्याने कामगारांची पळापळ झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या चार बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. 
 
प्राथमिक अंदाजानुसार शॉट सर्किटमुळे ही आग लागली असावी. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव आगीवर नियंत्रण मिळविले. अंबड येथील नागरिक धनंजय दातीर, शरद दातीर, सचिन दातीर, हरी दातीर, बाळासाहेब दोंदे, जनार्दन दातीर, अभि दातीर यांनी कंपनीतील २० कामगारांना तातडीने बाहेर काढले. 
बातम्या आणखी आहेत...