आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट सर्किटमुळे पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या डब्याला आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या साधारण वर्गाच्या डब्यात शॉर्ट सर्किटमुळे रविवारी सकाळी निफाड रेल्वेस्थानकजवळ आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली होती.

पाटणा ते मुंबईदरम्यान चालणारी पाटलीपुत्र एक्स्प्रेसला रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास निफाड रेल्वेस्थानकाजवळ साध्या डब्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. डब्यातून धूर येत असल्याने प्रवाशांना आग लागल्याचा संशय आला. त्यांनी त्वरित रेल्वे कर्मचारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. कर्मचाऱ्यांनी निफाड स्थानकावर गाडी थांबवून अग्निशमनला माहिती दिली. हा डबा पूर्णपणे रिकामा करण्यात आला. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. त्यानंतर सर्व गाड्या ह्या एक तास उशिरा धावत होत्या.
बातम्या आणखी आहेत...