आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंंबडमधील आग धुमसतीच, जबाबदारीबद्दल प्रश्नचिन्ह, आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - अंबड येथील आझादनगर येथील भंगार बाजारातील प्लॅस्टिक मटेरियलच्या सुमारे ५० पेक्षा जास्त गुदामांना शनिवारी (दि. १६) मध्यरात्री लागलेली आग सोमवारी दुपारपर्यंत थोड्याफार प्रमाणात सुरूच राहिली होती. इतक्या दीर्घ काळ चाललेल्या या आगीस कोण कारणीभूत आहे, असा प्रश्न आहे.
पुन्हा आग भडकण्याच्या शक्यतेने कामगार नागरिकांत भीतीचे वातावरण होते. येथील भंगार बाजार हटविण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही तो हटेना. त्यामुळे याला अभय कुणाचे, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आग विझविण्यासाठी सुमारे २० पेक्षा जास्त बंब घेऊन १०० कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळवले. मात्र रविवारी दुपारी अनेक ठिकाणी आगीने पुन्हा छोट्या-मोठ्या प्रमाणात डोके वर काढले. घटनेत प्राणहानी झाली नसली तरी शेजारच्या वस्तीवर ही आग पसरू शकली असती.

भंगारबाजार हटविण्यासाठी सुमारे ३२ वर्षांपासून लढा : भंगारबाजार हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव यांनी १९८३ साली त्यानंतर २००७ साली दिलीप दातीर यांनी लढा सुरू केला. हा भंगार बाजार शहराच्या आरोग्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय या ठिकाणी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून अनेक अनधिकृत धंदे सुरू असल्याचेही सांगितले. उच्च सर्वोच्च न्यायालयाने दिलीप दातीर यांच्या याचिकेचा निकाल देत भंगार बाजार हटविण्याचा आदेश दिला. मात्र पालिका पोलिस न्यायालयाचा आदेश जुमानत नसल्याचे दिसते. बाजारास पालिका पोलिस यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अग्निशमन केंद्रासाठी पाठपुरावा करणार
^एमआयडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. अनेक वेळा बंब वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे वित्तहानी वाढते. अग्निशमन केंद्राच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करू. - सीमा हिरे, आमदार,नाशिक पश्चिम

अवमान याचिका दाखल करणार
^बाजार हटवण्यासाठी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बाजार हटविण्याचे आदेश होते. मात्र पालिका आयुक्तांनी दखल घेतली नाही. आम्ही आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहोत. - दिलीप दातीर, माजीसभागृह नेते

वारंवार लागणाऱ्या आगीचे रहस्य काय?
भंगार बाजाराला वारंवार आग लागते. ती लागते की लावली जाते? प्रत्येक महिन्यात छोटी मोठी आग लागतेच. आगीनंतर कारवाई केली जात नाही. अनेक व्यवसायिकांना आगीनंतर विमा मिळतो. आग रात्रीच लागते. काही क्षणात आग रौद्र रूप धारण करते. त्यामुळे येथे ज्वलनशील पदार्थांचा अनधिकृत वापर होत असण्याचीही शक्यता व्यक्त होते. शिवाय कोणत्याही व्यावसायिकाकडे आग नियंत्रण सुरक्षा व्यवस्था केलेली नाही.
अंबड भंगार बाजारात रविवारी मध्यरात्री लागलेली आग सोमवारी सुरूच होती. त्यामुळे पुन्हा आग भडकण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण होते. आगीत तब्बल ५० पेक्षा जास्त दुकाने, गुदामे यात भस्मसात झाली आहेत.
बातम्या आणखी आहेत...