आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘के. के. वाघ’मधील संगणक लॅबला अचानक अाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- येथील के. के. वाघ महाविद्यालयाच्या संगणक लॅबला अाग लागल्याने संगणक खाक झाले. रविवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही अाग लागली. अग्निशामक दलाच्या एका बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली गेली.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅबला अचानक आग लागली. खालच्या मजल्यावर सुरू असलेल्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. छोट्या अग्निरोधक सिलिंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात अाला. तोपर्यंत अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल होत पंधरा मिनिटांत आग विझविण्यात अाली. सुटी असल्याने महाविद्यालयात विद्यार्थी संख्या कमी होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता महाविद्यालयातील सूत्रांनी दिली.