आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire Troopers 22 Teams For The Simhastha In Nashik

सिंहस्थासाठी राज्यभरातून अग्निशमन दलाची २२ पथके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपत्तीव्यवस्थापनासाठी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासह त्र्यंबकेश्वर नगरपालिका सज्ज झाली असून, त्यांच्या मदतीला राज्यभरातून कमिान २२ पथके शहर त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत.

कुंभमेळा काळात नाशिक अग्निशामक दलाच्या साहाय्यासाठी पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबविली, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, मालेगाव आदी महानगरपालिकांचे तसेच एमआयडीसी, सिडको या प्राधिकरणाचे अग्निशमन बंब त्यांच्या पथकासह उपलब्ध होणार आहेत. शहरातील सहा अग्निशमन केंद्र तसेच साधुग्राममधील चार तात्पुरत्या अग्निशामक केंद्रांसह विविध भागात २२ पथके कार्यरत राहणार आहेत. त्याशविाय दोन रेस्क्यू व्हॅन शोध बचाव पथकांसह तैनात असतील. फायर इंजिनिअरिंगचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी युवकांनाही यात सहभागी करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अग्निशामक दलामध्ये क्विक रिस्पॉन्स व्हेईकल्स, ब्रिदिंग ऑपरेटस व्हॅन, रेस्क्यू उपकरणे, ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन, फ्लड रेस्क्यू व्हॅन आदी अत्याधुनिक वाहने उपकरणे अग्निशामक दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याशविाय अरुंद बोळ, गर्दीची ठिकाणे आदी ठिकाणी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी दुचाकीवर बांधलेले वॉटर मिस्ट युनिट, अंधारामध्ये प्रकाशयोजना करण्यासाठी इन्फ्लॅटेब्ल लायटिंग मास्ट, पोर्टेबल लायटिंग सिस्टमि अशी यंत्रसामुग्री अग्निशामक दलाला उपलब्ध झाली आहे.

गर्दीच्या वेळी अग्निशमन बंब तत्काळ पोहोचण्यासाठी प्रशासकीय राखीव मार्गाचा वापर केला जाणार आहे. शहरातील सहा अग्निशमन केंद्रांबरोबरच कुंभमेळ्याच्या काळात साधुग्राम, बाह्य वाहनतळे, अंतर्गत वाहनतळे, भाविक थांबणारे क्षेत्र (स्टेजिंग एरिया) आदी ठिकाणी तात्पुरती अग्निशमन केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

त्र्यंबकेश्वरलारेस्क्यू व्हॅन तैनात : त्र्यंबकेश्वरयेथेही अग्निशमन दलाची आठ पथके एक रेस्क्यू व्हॅन उपलब्ध राहणार आहे. तेथील अग्निशामक दलाची जबाबदारी एमआयडीसीचे विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले यांच्यावर सोपविली आहे.

पुनर्वसनासाठी स्थळे निश्चित
नदीच्यापाणीपातळीत वाढ झाल्यास जलसंपदा विभागाशी समन्वय साधून ते इतरत्र वळविण्याबरोबरच घाट आणि नदीकाठी पोहणाऱ्यांचे जीवरक्षक पथक फ्लड रेस्क्यू लाँचर, लाईफ रिंग्ज, लाईफ जॅकेटस, फायबर रबर बोट‌्स आदी आवश्यक जीवरक्षक साहित्यासह तैनात ठेवले जाणार आहे. आपत्तीच्या वेळी नागरिकांना एका ठिकाणी जमविण्यासाठी जागेची आणि नंतर पुनर्वसनासाठी स्थळेही निश्चित केली आहेत, असे नाशिक महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले.

मदतीसाठीडायल करा १०१
कुठल्याहीआपत्तीला तोंड देण्याच्या सज्जतेसाठी अग्निशमन यंत्रणेने अनेक ठिकाणी मॉकड्रिल घेतलेे. २१ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींना ‘स्वयंसेवक’ म्हणून एकदविसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्तीच्या काळात अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षात १०७७ या क्रमांकावरदेखील संपर्क साधता येणार आहे.