आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये तरुणाची डोक्यात गोळी झाडून हत्या, पत्नी-बहिणीसमोर गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकरोड भागातील आर्टिलरी सेंटररोडवरील जैन भवनासमोर मंगळवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून रणजित मंगवाना या मालमत्ता खरेदी-विक्री व्यवसायातील तरुणाची डाेक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. अाधीचा वाद मिटविण्यासाठी त्याला उशिरा घराबाहेर बाेलविण्यात अाले. काही अंतरावर त्याला मारहाण सुरू असताना पतीला धाेका असल्याची जाणीव झाल्याने या सर्वांचा पाठलाग करणारी पत्नी अाणि बहिणीसमाेर रणजितवर अगदी जवळून गाेळी झाडण्यात अाली. याप्रकरणी उपनगर पाेलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. या घटनेनंतर बुधवारी सकाळी जय भवानीरोड परिसरात दहशतीचे वातावरण होते. तेथील सर्व दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवले होते. फर्नांडिसवाडी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. संशयितांच्या तपासासाठी पाेलिसांची पथके रवाना झाली हाेती, मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत याप्रकरणी काेणालाही ताब्यात घेण्यात अाले नव्हते.

रणजित यांच्या पत्नी गीता यांनी याप्रकरणी फिर्याद दिली अाहे. हे कुटुंबीय जय भवानीरोडवर देवरथ अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास अाहे. रणजीत यांचा जमीन स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय हाेता. ते माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांचे खंदे समर्थक हाेते.
पुढे वाचा... मंगळवारी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रोहित ऊर्फ माले, गोविंद डिंगम, मयूर चमन बेद, संजय ऊर्फ माँडेल चमन बेद आणि विनोद राजाराम साळवे हे चौघेजण घरी आले.