आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अानंदनगरला आर्थिक वादातून एकावर गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड -  नाशिकरोड येथील आनंदनगर परिसरातील कदम लाॅन्सजवळ राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीवर शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कारमधून आलेल्या चार संशयितांनी वडनेर गेटजवळील एल अॅण्ड टी कंपनीच्या जुन्या कार्यालयासमोर त्याचे वाहन अडवत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी घडली. संबंधित गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
नाशिकरोडच्या आनंदनगर परिसरातील तुलसी निवास अपार्टमेंटमध्ये शिवमीलन रामराज सिंग हा राहतो. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवमीलन सिंग हा रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून एमएच १५ डीसी २५३७ या क्रमांकाच्या फोर्ड फिगो कारमधून वडनेर गेटमार्गे घरी परतत होता. यावेळी दोन चारचाकी वाहनातून त्याचा पाठलाग करणाऱ्या चार संशयितांनी सिंगचे वाहन अडवत त्याला कारमधून खाली उतरवत त्याच्या कानाजवळ रिव्हाॅल्व्हर लावली. यानंतर सिंगने घाबरून डाव्या हाताने संशयितांच्या हाताला धक्का देत रिव्हाॅल्व्हर झटकली. याचवेळी सिंगच्या डाव्या हाताला गोळी लागली. त्यानंतर सिंगला दीपक सपकाळ आणि महादेव कोळी यांनी बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर सिंगला खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. सिंग यामध्ये किरकोळ जखमी झाल्याने तो धोक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केल्यानंतर या ठिकाणी दोन काडतुसे मिळाली असून, यामध्ये एक जिवंत होते तर एक रिकामी पुंगळी मिळाली. पोलिसांनी रात्री उशिरा सिंग याने सांगितलेल्या संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. 
 
पैसे बुडविण्यासाठी बनाव रचल्याचा संशय 
शिवमीलन सिंग याच्याकडे उधारी असल्याने ते पैसे बुडविण्यासाठी त्याने स्वत:वरच गोळीबार घडवून आणला, असा संशय असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. तसेच शिवमीलन सिंगवर शहर पोलिस ठाण्यात खंडणी मागण्यासह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सिंग याचे अनेक जणांशी आर्थिक व्यवहार असून पैसे बुडविण्यासाठीही त्याने स्वत:वर गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चार संशयित रात्री ११.३० वाजेच्या कोठे होते याचा तपास पोलिस सीसीटीव्ही आणि मोबाइल लोकेशनवरून करीत असल्याचे श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...