आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी तरुणाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू, नाशिक येथील गोळीबार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पूर्ववैमन्यस्यातून चाैघांनी दोन तरुणांवर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी पंचवटी महाविद्यालयासमोर घडली. यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्‍याचा उपचारादरम्‍यान शुक्रवारी मृत्‍यू झाला. गेल्या तीन दिवसांत दोन गोळीबारच्या घटनांमुळे पंचवटी हदरली आहे. राहुल टाक (वय २२ रा. गोरेवाडी) असे मृताचे नाव आहे. त्‍याच्‍या डोक्‍यात गोळी शिरली होती.

राहुल आणि अमित देसले यांचा संशयीत सुशांत वाबळे, राहुल कदम, संतोष पवार, अमोल पाटील यांच्याशी वाद होता. वाद मिटवण्यासाठी राहूल व अमित पंचवटी महाविद्यालय परिसरात आले होते. येथे वाद झाल्याने संशयितांनी देसलेवर गावठी कट्टा रोखला. प्रतिकार करत असतांना संशयीतांनी गोळी झाडली. देसले खाली बसल्याने पाठीमागे उभा असलेल्या राहुलच्या भुवईवर गोळी लागून तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
बातम्या आणखी आहेत...