आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक फर्स्ट’तर्फे वाहनचालकांची अाराेग्य तपासणी; जागृती अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक : रस्तासुरक्षा साप्ताहांतर्गत ट्रक टर्मिनस, आडगाव नाका येथे ट्रकचालकांसाठी ‘नाशिक फर्स्ट’च्या वतीने वाहनचालकांसाठी दाेन दिवसीय अाराेग्य तपासणी शिबिर वाहतूक सुरक्षेविषयी जागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात अाला. 
 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील, महामार्ग प्राधिकरणचे झोडगे नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी, एम. डी. देवेंद्र बापट, जनरल सेक्रेटरी मिलिंद जांबोटकर, संचालक सुरेश पटेल, संजय देशमुख, मधुकर बापट, प्रमोद लाड, जयंतराव हुन्नर्गीकर, अलोक झा, सीमा बापट, डॉ. सुनीता देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
 
अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात नाशिक फर्स्टचे कार्य विशद केले. डॉ. मृणाल पाटील यांनी मोठी वाहने चालविताना चालकांनी जबाबदारीचे भान ठेवण्याचे अावाहन केले. याप्रसंगी पोलिस उपयुक्त विजय पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले.
 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी वाहनचालकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे अावाहन केले. अंजू सिंघल यांनी त्यांचे अनुभव सांगितले. नाशिक फर्स्टच्या सदस्या डॉ. सुनीता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद जांबोटकर यांनी आभार मानले. दिवसभरात ११३ ड्रायव्हर्स क्लीनर्स यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली.