आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात महिलांसाठीच्या फूड क्लस्टरला मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर परिसरातील ३० महिला उद्योजिका एकत्रितपणे त्यांच्या उत्पादनांसाठी नाशिकमध्ये फूड क्लस्टर स्थापन करत आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून या महिलांसाठी फूड क्लस्टरचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार, या प्रस्तावाला शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
"एमआयडीसी'कडे अंबड औद्योगिक वसाहतीत दोन एकर जागा या क्लस्टरसाठी मागण्यात आली असून, ती मिळाल्यास हा क्लस्टर साकारणे सुलभ होणार आहे. महिलांकडून चालविला जाणारा अशा प्रकारचा हा देशातील हा एकमेव फूड क्लस्टर असेल.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे मिटकॉनच्या सहकार्याने ४० महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले गेले. या महिला प्रशिक्षणार्थींनी मुंबई पुणे येथील उद्योगसमूहांना भेटी देऊन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. प्रशिक्षणार्थींची मुलाखत, प्रबोधन निवड प्रक्रियेनंतर २० उत्सुक महिलांची निवड करून समूह निर्माण करण्यात आला.

या समूहाने उद्योग करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि शासनदरबारी क्लस्टर उभारणीसाठी करावयाच्या कामांसाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेतला. कंपनी कायदा १९५६ मधील कलम २५ अंतर्गत, उद्योगिनी क्लस्टर प्रा. लि. नावाने कंपनी स्थापण्यात आली. २० महिला या कंपनीच्या सदस्या आहेत. जिल्हा समन्वय समितीकडून या क्लस्टरला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनानेही या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. समान प्रक्रिया उद्याेजक सदस्यांसाठी म्हैसुरला तांत्रिक सुधारणा प्रशिक्षण दिले जाणार अाहे.

‘उद्योगिनी क्लस्टर’मध्ये हे उद्योग : ‘उद्योगिनीक्लस्टर’मध्ये अन्नप्रक्रिया उद्याेगांचा समावेश असेल. त्यात पारंपरिक पापड, कुरडई लाेणचे यांसारख्या उद्याेगांत गुरफटता नवनवे अन्नप्रक्रिया प्रकल्प, उत्पादन, पॅकेजिंग, लेबलिंग यांसारखे उद्याेग, त्यासंदर्भातील संशाेधन विकास केंद्रही येथे असेल.

उद्याेगमंत्र्यांकडे जागेसाठी साकडे

क्लस्टरलाराज्य शासनाने मंजुरी िदली असली, तरी तूर्तास ‘एमअायडीसी’कडून अपेक्षित दोन एकर जागा उपलब्ध झालेली नाही. ही जागा उपलब्ध करून देण्याची मागणी क्लस्टरच्या वतीने उद्याेजिका नीलिमा पाटील यांनी गेल्या महिन्यात नाशिक दाैऱ्यावर आलेल्या उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठकीत केली होती. त्यावर सकारात्मक िनर्णय घेण्याचे अाश्वासन उद्याेगमंत्र्यांनी िदले होते.