आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिले अत्याधुनिक पोलिस ठाणे अाडगावला, अाॅनलाइन तक्रार करता येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पोलिस आयुक्तालयाच्या १३ पोलिस ठाण्यापैकी एक आडगाव पोलिस ठाणे राज्यातील पहिले अत्याधुनिक पोलिस ठाणे ठरले आहे. पोलिस आयुक्तालयाप्रमाणे सुसज्ज असलेल्या या पोलिस ठाण्यात नागरिकांना ऑनलाइन तक्रार करणे शक्य होणार अाहे. बुधवारी (दि. १९) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पोलिस ठाण्याचे औपचारिक उद‌्घाटन होत आहे.
 
आडगाव पोलिस ठाण्याच्या निर्मितीनंतर २०११ पासून बीएसएनएलच्या जागेत पोलिस ठाण्याचा कारभार सुरू झाला. पोलिस ठाण्यासाठी हक्काची जागा मिळण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सरकारी जागा शोधली. हनुमाननगर परिसरात पोलिस ठाण्यासाठी २० गुठे जागा मिळाली. पोलिस कल्याण गृहनिर्माण महामंडळच्या अधिकाऱ्यांना जागेची पहाणी करत पोलिस ठाणे निर्माण करण्याचे निविदा काढल्या. पोलिस आयुक्तालय साकरलेल्या आर्किटेक्टने आडगाव पोलिस ठाणे साकरले. पोलिस ठाण्याच्या दर्शनीभागात प्रशस्त ठाणे अंमलदार कक्ष, आवक जावक विभाग, असणार आहे. तक्रारदारांना इतर कुठेही जाता एकाच ठिकाणी तक्रार देणे शक्य होणार आहे.महिला-पुरुष कर्मचाऱ्यांसाठी विश्राम कक्ष पोलिस अधिकारी कक्ष, गुन्हे निरीक्षक कक्ष, सुरक्षित लॉकअप बनवण्यात आले आहे. २७ टेबल खुर्ची आणि भिंतीमध्येच सर्व गोपनिय कागदपत्र आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी कपाटे बनवण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यात सर्व एलइडी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिस ठाणे अधिक चकमदार दिसते.

अधिकाऱ्यांचा कार्यकाल
पंचवटीपोलिस ठाण्याचे विभाजन करण्यात येऊन आडगाव पोलिस ठाण्याची निर्माती करण्यात आली. तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांच्याहस्ते बीएसएनएलच्या जागेच पोलिस ठाण्याचे उद‌्घाटन करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक सुभाष डवले हे पोलिस ठाण्याचे पहिले अधिकारी ठरले. बाजीराव महाजन, अनिल पवार, संजय सानप, या तत्कालीन निरीक्षकांनी पोलिस ठाण्याची धुरा सांभाळली. आता या पहिल्याच नवीन अत्याधुनिक पोलिस ठाण्याचे अधिकारी सुनील पुजारी ठरले आहे.
 
नवीन नियमानुसार लॉकअप
पोलिसठाण्यात लॉकअप सुरक्षेबाबत अनेक प्रश्न पुढे आले असताना पोलिस महासंचालक कार्यालयाने लॉकअपसाठी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार राज्यातले पहिलेच सुरक्षित लॉकअप बनवण्यात आले आहे. सिमेंट आणि ग्रीलचा वापर करून खिडकी नसलेले हे लॉकअप सुरक्षित असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...