आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Priority To Sihasth Security Police Commissioner S.Jagannathan

सिंहस्थात सुरक्षिततेला प्राधान्य, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशभरातील काेट्यवधी भाविक ज्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात येणार अाहेत, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वाेच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही नूतन पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी पदभार स्वीकारताना शुक्रवारी दिली.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वप्रथम गुन्हे राेखण्याबराेबरच गुन्हे घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांवर भर देण्यात येईल. पाेलिस तपासात कुठेही राजकीय हस्तक्षेप झाल्यास संबंधितांचे लाेकप्रतिनिधी म्हणून सन्मानाने एेकून घेतले जाईल. परंतु, कायद्याच्या चाैकटीत राहूनच गुन्हेगारांना शासन केले जाईल. त्यात काेणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. सिंहस्थाच्या बंदोबस्ताचे पाेलिस यंत्रणेसमाेर सर्वात मोठे आव्हान आहे. गुन्हेगारी रोखण्यास कर्मचारी-अधिकारी यांना बरोबर घेतले जाईल. पोलिस आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेला ‘सुसंवाद’ यापुढेही कायम राहील. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी गेल्या तीन वर्षांत तत्कालीन अायुक्त सरंगल यांनी जनताभिमुख पाेलिसिंगच्या याेजना राबविल्या, त्याच पुढील काळातही कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक व्यवस्था सुधारण्याकरिता ठोस उपाययोजना अाठवडाभरात अधिकारी, कर्मचाऱ्यांशी बाेलून याेग्य ते नियाेजन केले जाईल. त्यानंतरच बाेलणे उचित राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल अधिकाऱ्यांचा निरोप स्वीकारत असताना भावुक झाले होते. यावेळी आयुक्त जगन्नाथन यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारापर्यंत येऊन त्यांना निरोप दिला.

अायएएस-अायपीएसवाद दूर करणार : अायएएस-अायपीएसयांच्यातील निर्माण झालेल्या वादामुळे शहराची सुरक्षितता अाणि सिंहस्थाचे नियाेजन धाेक्यात येण्याची शक्यता जगन्नाथन यांनी फेटाळून लावली. या दाेन केडरमधला प्रतिष्ठेचा भाग बाजूला ठेवून एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेऊ. दाेघेही जनतेचे सेवकच अाहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

नवीन पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी शुक्रवारी मावळते पाेलिस अायुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यानंतर पाेिलस अधिकाऱ्यांचा निराेप घेताना सरंगल.

नाशिककरांनी भरभरून प्रेम दिले
नागरिकांच्यासहकार्यानेच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यास यश आले. कुंभमेळ्याच्या नियोजनात कसूर नाही. कुंभमेळा यशस्वी होण्याकरिता कायम सहकार्य असेल. -कुलवंतकुमार सरंगल, माजी पोलिस आयुक्त, नाशिक शहर