आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील पहिला काैशल्य विकास प्रकल्प नाशिकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे काैशल्य विकसित व्हावे व त्याचा लाभ शहरविकासाला व्हावा या उद्देशाने नाशिकमध्ये कामगारांकरिता काैशल्य विकास प्रकल्प सुरू हाेत अाहे. बांधकाम व्यावसायिकांची संघटना ‘क्रेडाई’ने त्यासाठी पुढाकार घेतला अाहे. हा देशातील पहिला काैशल्य विकास प्रकल्प ठरणार अाहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काैशल्य विकासावर भर देण्याची घाेषणा केल्यानंतर िस्कल डेव्हलपमेंट करिता देशभरात प्रयत्न सुरू झाले. शासकीय संस्था जशा याकरिता सरसावल्या तशाच अशासकीय संस्थांनीही याकरिता कंबर कसली अाहे. क्रेडाई नाशिकने हे अाव्हान स्वीकारत हा प्रकल्प हाती घेतला अाहे. क्रेडाई नाशिकचा साेमवारी वर्धापन दिन असून याच मुहूर्तावर हा उपक्रम सुरू करण्यात येत अाहे. जाे देशातील संघटनेच्या माध्यमातून राबविला जाणारा पहिलाच प्रकल्प अाहे.

फायदा काय?
काैशल्य एकसारखेच विकसित झाल्यामुळे बांधकामांची गुणवत्ता सुधारेल, माल वाया जाण्याचे प्रमाण घटेल, त्यातून बांधकाम साहित्याचा सुयाेग्य वापर हाेवू शकेल अाणि एकसारखेपणा बांधकाम प्रकल्पांच्या बांधकामांत िदसेल. कामगारांचेही काैशल्य विकसित हाेणार असून त्याचा फायदा त्यांचे उत्पन्न वाढण्यास हाेऊ शकेल.

पुण्यातील ‘कुशल’ची हाेणार मदत
‘कुशल’ या पुण्यातील संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात अाहे. या संस्थेकडून क्रेडाई हा प्रकल्प विकत घेणार अाहे.‘कुशल’ संस्थेचे प्रशिक्षक सुरुवातीला बार बेंडर, गवंडी, प्लॅस्टरकाम, सेंट्रिंग कामगार, सहायक कामगार यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारातील सात कामगारांना प्रशिक्षित करेल. थेट बांधकाम प्रकल्पांवरच हे प्रशिक्षण िदले जाणार असून एक महिन्यातच ही पहिली बॅच तयार हाेईल. दाेन महिन्यात असे चाैदा कामगार प्रशिक्षित हाेतील, जे शहरातील िकमान २० साइटवर जाऊन तेथील मजुरांचे काैशल्य वाढवतील. यातून कुशल मनुष्यबळाची संख्या वाढत जाईल, यातून कार्यरत हजाराे बांधकाम मजुरांना प्रशिक्षण देऊन कुशल केले जाईल.

सीएसअारमधून हाेणार खर्च
^क्रेडाईचे सभासद सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठीचा खर्च उचलतील. कामगारांना त्याकरीता कुठलेच शुल्क द्यावे लागणार नाही. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येईल. त्यांचे काैशल्य वाढून उत्पन्न वाढण्यास मदत हाेऊ शकेल.
- जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
बातम्या आणखी आहेत...