आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्माेस क्षेपणास्त्रासह सुखाेई-३० चे नाशिकच्या आेझरजवळ उड्डाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शनिवारचा दिवस एचएएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिवा असा ठरला. सुखाेई - ३० एमकेअाय या फायटर कॅरिअर विमानाद्वारे प्रथमच ब्रह्माेस मिसाइल वाहून नेण्याची एेतिहासिक कामगिरी नाशिकजवळील अाेझर विमानतळावर घडली.

संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात अालेली ही कामगिरी म्हणजे संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’चे पुढचे पाऊल ठरली अाहे. या विशेष अाव्हानासाठी एचएएलने सुखाेई अाणि ब्रह्माेसमध्ये काही विशेष बदल करुन घेतल्यानेच हे शक्य झाले अाहे. फायटर विमानांच्या इतिहासातील ही एक एेतिहासिक घटना असून कुशल शास्त्रज्ञ, अभियंते, ‘मेक इन इंडिया’ अाणि अभियंत्यांच्या काैशल्याची परिसीमा दर्शवणारे उदाहरण अाहे.

जगात प्रथमच
सुखाेई - ३० एमकेअाय या विमानाद्वारे २५०० किलाे वजनाचे ब्रह्माेससारखे सुपरसाॅनिक क्रुझ मिसाइल नेण्याची ही जगातील पहिली घटना असल्याचे ब्रह्माेस एराेस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,व्यवस्थापकीय संचालक सुधीरकुमार मिश्रा यांनी म्हटले.

हे अाहे सर्वाधिक विशेष
सुखाेई विमान हे सर्वप्रथम रशियात बनत हाेते. त्यानंतर त्यांच्याकडून पार्ट अाणून दाेन दशकांपूर्वी ते भारतात एचएएलमध्ये असेंबल करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर रशिया अाणि भारतीय शास्त्रज्ञ - तंत्रज्ञांच्या संयुक्त प्रयत्नातून ते एचएएलमध्ये बनवले जाऊ लागले.
बातम्या आणखी आहेत...