नाशिकरोड- बिटको महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रा. डॉ. चित्रा म्हाळस यांच्या पाच मराठी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी व प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.
मध्ययुगीन मराठी प्रेम कविता, अर्वाचीन मराठी प्रेम कविता, आधुनिक मराठी प्रेम कविता भाग 1 व 2, तसेच प्रेम कवितेचे स्वरूप आणि स्थित्यंतरे आदी पाच पुस्तकांचे स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे आणि लीलावती प्रकाशन, अहमदनगर यांच्या सहकार्याने प्रकाशन झाले. काव्य क्षेत्रात संशोधनाला नवीन दिशा देण्याचे काम पुस्तकाच्या रूपाने डॉ. म्हाळस यांनी केले आहे. या वाड्मयाने विद्यार्थ्यांना वेगळी दृष्टी दिल्याचे प्रतिपादन डॉ. गोसावी यांनी या वेळी केले. डॉ. कुलकर्णी, डॉ. म्हाळस यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रा. श्यायोन्ती तलवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रा. गंगाधर अहिरे, डॉ. स्वाती टोकेकर, अंजली रत्नपारखी, प्रा. सुरेंद्र घाटपांडे, प्रा. जयंत भाभे, प्रा. सुरेखा पूरकर आदी उपस्थित हाते.