आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दिवसात पाचशे रुग्णांची माेफत कॅन्सर तपासणी , शहरात दोनदिवसीय उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : कॅन्सरमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. म्हणूनच कॅन्सरची वेळीच तपासणी हाेणे गरजेचे असल्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक अाणि नाशिक मिडटाउनच्या वतीने शहरात मोफत कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. या शिबिराच्या दाेन दिवसांत पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात अाली. यापैकी २० रुग्णांत कॅन्सरचे निदान झाले अाहे. 
 
मिशन कॅन्सर जागृती अभियानांतर्गत सर्वात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज कॅन्सरनिदान मोबाइल व्हॅनद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला. जानेवारी असे दाेन दिवस हे शिबिर चिंतामणी मंगल कार्यालय, गंगापूररोड येथे झाले. शिबिराचे उद्घाटन कॅन्सरतज्ज्ञ डाॅ. राज नगरकर, मारवाडी युवा मंचचे प्रदेश महामंत्री सुमित बोरा, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माेतीवाला कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वानंद शुक्ला, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेच्या, डॉ. प्रीतीश लोढा डॉ. अल्पना लोढा, नेत्र कॉलेजच्या संचालिका निकिता कोठारी, माज़ी सभापति राजेंद्र देसाई, संगीता देसाई, कॅन्सर जागृतीच्या प्रांतीय संयोजिका सुरची पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हाेत्या. 
 
डाॅ. राज नगरकर यांनी कॅन्सर निदान उपचार या विषयावर माहिती दिली. स्वागत शाखा अध्यक्ष ललित बुब यांनी केले. मंचबद्दलची माहिती मिडटाउनच्या शाखा अध्यक्षा स्मिता बोरा यांनी दिली. शाखा सचिव आशिष मालपाणी यांनी सूत्रसंचालन केले. मिडटाउन शाखा सचिव शिल्पा राका यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रदीप बूब, राजेंद्र पारीख, नेमीचंद पोतदार, सुनील चोपडा, अशोक तापडीया, दिलीप बेनीवाल, हेमंत मालपाणी यांची उपस्थिती हाेती. शिबिर यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष महेंद्र पोतदार, पंकज परशुरामपुरीया, केतन मनियार, गाेविंद मुंदडा आदी प्रयत्नशील होते. 
 
दहा रुग्णांमध्ये आढळला कॅन्सर 
पुरुषअाणि महिला अशा दोघांसाठी हे शिबिर खुले हाेते. त्यात पाचशे नाशिककरांनी अापली तपासणी करून घेतली. त्यापैकी सहा महिला अाणि चार पुरुषांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. तर, एका रुग्णाला थॅलेसेमिया असल्याचे निदान झाले. त्याच्या उपचारासाठी मंच मदत करणार अाहे. कॅन्सरच्या तपासण्यांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या बसद्वारे तपासण्या केल्या. 

सीबीसी काऊंट, मुख कर्कराेगाच्या तपासण्या, स्तन कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, प्राेस्टेट ग्रंथींचे कॅन्सर अशा कॅन्सरच्या सर्व प्रकारच्या नेत्रराेग तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या.