आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच पोलिस ठाण्यांना मिळाले नवीन पीआय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील १९ पोलिस निरीक्षकांच्या शुक्रवारी अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. अलीकडच्या काळात शहर पोलिसांतील हा सर्वात मोठा फेरबदल म्हणता येईल.गुन्हे शाखेच्या निरीक्षकापदी शंकर जिरगे तर वाहतूक शाखेत आर. एस. घोडके (दक्षिण विभाग), एस. डी. घार्गे (उत्तर विभाग) यांची नियुक्ती झाली.
प्रत्येक अधिकाऱ्यांची ज्येष्ठता, कामाची पद्धत, त्यांची वैयक्तिक माहिती या बाबींचा विचार करून बदल करण्यात आलेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांची वाचक शाखेत, तर फौजदार चावडीचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची दुय्यम निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. आता शहरातील सात पैकी पाच पोलिस ठाण्यांना नवीन पीआय मिळाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठाण्यात अनेकजण ठाण मांडून बसले होते. श्री. सेनगावकर यांनी पदभार घेतल्यापासून पोलिस दलात नवे बदल होत आहेत. चोरी, घरफोडी रोखण्याचे नव्या पीआयपुढे आव्हान असणार आहे.
बदल्या करताना या बाबींना प्राधान्य
गुणवत्ता, ज्येष्ठता, मागील रेकॉर्ड, शिक्षा, शिक्षण, कामाची पध्दत, पारदर्शकता, कार्यक्षमता, नागरिकांशी असलेले चांगले संबंध. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी याचा प्राधान्याने विचार करण्यात आल्याचे दिसून येते.
आता सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या!
येत्या आठ दिवसांत आता सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या अपेक्षित आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यानंतर श्री. सेनगावकर यांनी एसीपींच्या फाइलींचा अभ्यास सुरू केला आहे. येत्या आठ दिवसांत त्यांची बदली करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
पोलिस अधिका-यांची नावे-
ए. जी. भांबुरे-नव्याने बदलून आले आहेत. (फौजदार चावडी, वरिष्ठ ) - सूर्यकांत पाटील (फौजदार चावडी, दुय्यम) -विष्णू पवार -दंगा नियंत्रण पथक (एमआयडीसी, वरिष्ठ) -एस. डी. दसूरकर -नव्याने बदलू आलेत. (सदर बझार, वरिष्ठ) -संजय जगताप (दुय्यम, सदर बझार) -एन. जी. अंकुशकर -नव्याने बदलून आलेत. (विजापूर नाका, वरिष्ठ) -बाळकृष्ण साळुंखे (दुय्यम, विजापूर नाका) -आय. एस. सय्यद -मासंवि ( एमआयडीसी, दुय्यम) -आर. एस. घोडके -नियंत्रण कक्ष (वाहतूक शाखा, दक्षिण) -एस. डी. घार्गे-सायबर सेल (वाहतूक शाखा, उत्तर) -एन. बी. बेणके -एमआयडीसी ( विशेष शाखा) -शंकर जिरगे : नियंत्रण कक्ष (गुन्हे शाखा) -बी. एम. जाधव -फौजदार चावडी (अर्थिक गुन्हे सायबर सेल) -एस. बी. वाघमारे -विशेष शाखा (सुरक्षा शाखा) -जी. एल. माढेकर-नव्याने बदलून आलेत. (महिला सुरक्षा शाखा) -यशवंत शिर्के -वाहतूक शाखा (नियंत्रण कक्ष) -एच. एन. खाडे-एमआयडीसी (अतिक्रमण पथक दंगा नियंत्रण पथक) -संदीप गुरमे- गुन्हे शाखा (वाचक शाखा, मूळ पदावर) -एम. डी. शिंदे -नियंत्रण कक्ष (मानव संसाधन विभाग) -जेल रोड सलगर वस्ती या दोन ठाण्याच्या पीआय यांची बदली झाली नाही.
- पीआयच्या बदल्या केल्या, आता मला त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या खूप अपेक्षा आहेत.पोलिसिंगमध्ये बदल दिसतील. घरफोडी, चोरी, गुन्हेगारी रोखण्याचे लक्ष्य राहील. वाहतूक सुधारणे, पोलिसांचे काम यापुढे पारदर्शपकणे दिसेल. सर्वांंना कामाची संधी दिली आहे, पाहूयात.''
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त