आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी सिंहस्थाची : भाविकांच्या आरोग्यासाठी रेल्वेची पाच वैद्यकीय पथके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या अाराेग्याची काळजी घेण्यासाठी मध्य रेल्वेची पाच वैद्यकीय पथके नाशिकराेड रेल्वे स्थानकावर तैनात राहणार अाहेत. रेल्वेने देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या साेयीसाठी रेल्वेने अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली असून, अहमदाबादप्रमाणे नाशिकराेडला दुर्दैवी घटना घडू नये म्हणून अतिरिक्त जाण्या-येण्याचे मार्ग पादचारी पुलही उभारला अाहे.
भाविक अाजारी पडले अथवा अपघाताची घटना घडल्यास रुग्णांना तत्काळ प्रथमाेपचार मिळावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकावर वैद्यकीय पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला अाहे. या पथकात रेल्वेचे अकरा डाॅक्टर राहणार असून, त्यांची पाच पथकांत विभागणी केली जाणार अाहे. ही पथके स्थानकावर २४ तास उपलब्ध असतील. पथके कुठे तैनात करायची याबाबत प्रशासनाचे एकमत झाले नसले तरी नाशिकराेड पूर्वेकडील प्रवेशव्दारावर प्रत्येकी एक तसेच दाेन तीन क्रमांकाच्या फलाटावर एक-एक पथक तैनात ठेवण्याचा निर्णय झाला अाहे.
दाेन पथकाबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार अाहे. पथकासाठी जागेचा शाेध घेतला जात अाहे.
या पथकांकडून प्राथमिक उपचारच केले जातीलव अाैषधे दिले जाईल त्यापुढील अाजाराच्या रुग्णाला पालिकेच्या बिटकाे अथवा नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले जाणार अाहे. त्यासाठी दाेन्ही प्रवेशव्दाराबाहेर रुग्णवाहिका ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.