आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांच्या मदतीने पाच चंदनचाेर जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - नाशिकराेड परिसरात एकाच रात्रीत दाेन ठिकाणी घराला बाहेरून कडी लावून तसेच वृक्ष मालकांना शस्त्राचा धाक दाखवत चंदन वृक्षांची चाेरी करण्यात अाली. यानंतर पलायन करणाऱ्या पाच जणांच्या टाेळीला नागरिकांच्या मदतीने उपनगर पाेलिसांनी शुक्रवारी पहाटे जेरबंद केले. न्यायालयाने संशयितांना २९ जूनपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली असून, संशयितांकडून इंडिगाे कार, सुमारे ८० हजार रुपये किमतीचे चंदन तसेच माेठा शस्त्रसाठा जप्त करण्यात अाला.
काही दिवसांपासून चंदनचाेरांनी नाशिक, अंबड, सातपूर, नाशिकराेड या भागात हाैदाेस घातला हाेता. येथील चंदनचाेरी उघडकीस अाल्याने चाेरट्यांनी शुक्रवारी पहाटे एकाच परिसरातील दाेन चंदन वृक्षांची चाेरी केली. चाेरी करण्यात ते यशस्वी झाले, मात्र पलायन करताना स्थानिक रहिवाशांच्या लक्षात ही बाब अाल्यानंतर संघटित प्रयत्नात पाच जणांना अटक करण्यात पाेलिसांना यश अाले. सीताराम कुऱ्हाडे, कैलास मांजरे, खुशाल कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर गायकवाड (रा. श्रीरामपूर) साेमनाथ जाधव (रा. बीड) या संशयितांनी शुक्रवारी पहाटे वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त प्राध्यापक बळवंत बाबूराव बावदनकर (७३, रा. निशिगंधा पराग साेसायटी, डावखरवाडी) यांच्या घराला बाहेरून कडी लावली अावारातील दहा ते पंधरा फुटांच्या चंदन वृक्षाची ताेड सुरू केली. याचवेळी बावदनकर यांचे शेजारी गाैतम मक्कर यांनी चाेरट्यांना हटकले झाड का ताेडता, अशी विचारणा केली असता, संशयितांनी काेयता, करवत कुऱ्हाडीचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मक्कर यांनी अारडाअाेरड सुरू केल्याने रहिवासी जागे झाले.

चाेर-पाेलिसांत लपाछपी
चंदनचाेरीनंतर अारडाअाेरड झाल्याने परिसरातील रहिवासी जागे झाले. पाेलिस घटनास्थळी पाेहोचल्यानंतर चाेरट्यांनी पळ काढला. पाेलिसांपासून सुटका करण्यासाठी चाेरट्यांनी परिसरातील साेसायट्या, घरांमध्ये लपण्याचा प्रयत्न जागृत रहिवाशांमुळे सपशेल फसला. अाडाेसा बघून लपणाऱ्या चाेरट्यांची माहिती क्षणाक्षणाला नागरिक पाेलिसांना देत असल्याने काही तासांच्या लपाछपीच्या खेळानंतर या चाेरट्यांना जेरबंद करण्यात पाेलिसांना यश अाले.

पाेलिसांमध्ये संचारला उत्साह
नकारात्मकघटनांमुळे बदनाम झालेल्या पाेलिसांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मरगळ अालेली हाेती. शुक्रवारच्या कारवाईत सराईत चाेरट्यांना पकडण्यात यश अाल्याने पाेलिसांमध्ये उत्साह संचारला गेला.
बातम्या आणखी आहेत...